AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs SRH : सनरायजर्स हैदराबादसमोर आरसीबीचं आव्हान, गतविजेत्यांची प्लेइंग ईलेव्हन कशी असणार? जाणून घ्या

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमात सलामीच्या सामन्यात कोणत्या प्लेइंग ईलेव्हनसह उतरणार? जाणून घ्या संभाव्य प्लेइंग ईलेव्हन.

RCB vs SRH : सनरायजर्स हैदराबादसमोर आरसीबीचं आव्हान, गतविजेत्यांची प्लेइंग ईलेव्हन कशी असणार? जाणून घ्या
Royal Challengers Bengaluru vs Sunrisers HyderabadImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 28, 2026 | 1:33 AM
Share

सनरायजर्स हैदराबाद आणि गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) सलामीच्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. हा सामना शनिवारी 28 मार्च रोजी बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांनी सलामीच्या सामन्यासाठी कोचिंग स्टाफच्या मार्गदर्शनाखाली सराव केला आहे. आरसीबी गतविजेता आहे. त्यामुळे आरसीबीचा हा सामना जिंकून विजयी सलामी देण्याचा प्रयत्न असणार आहे. तर इशान किशन कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात सनरायजर्स हैदराबादला विजयी करण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असू शकते? हे जाणून घेऊयात.

दोन्ही संघांमध्ये विस्फोटक फलंदाज

उभयसंघातील सामना हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे हैदराबादबादपेक्षा आरसीबीला सपोर्ट जास्त असेल, हे वेगळं सागंण्याची गरज नाही. घरच्या मैदानात सामने होत असल्याने चाहत्यांना खास करुन अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्याकडून मोठ्या आणि चाबूक खेळीची आशा असणार आहे. तसेच कॅम डेव्हिड आणि रोप्टन रजत पाटीदार टीमारियो शेफर्ड या विस्फोटक फलंदाजांकडून मोठी खेळी अपेक्षित असणार आहे.

तसेच सनरायजर्स हैदराबादच्या संघातही तोडीसतोड आणि आक्रमक फलंदाज आहेत. एसआरएचटक फलंदाज आहेत.  टीममध्ये अभिषेक शर्मा, ट्रेव्हीस हेड, इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन हे नावाजलेले विस्फोत्यामुळे चाहत्यांना पहिल्या सामन्यात हायस्कोरिंग सामना पाहायला मिळेल, अशी चिन्हं दिसत आहेत.

तर दोन्ही संघात गोलंदाजही एकमेकांना तोडीसतोड आहेत. आरसीबीच्या गोटात भुवनेश्वर कमार रोमरियो शेफर्ड, टीम डेव्हिड आणि सुयश शर्मा आणि इतरांवर गोलंदाजीचा मदार असू शकते.

तर सनरायजर्स हैदराबादकडे शिवम मावी, नितीश कुमार रेड्डी, जयदेव उनाडकट, ब्रायडन कार्स आणि इतर वेगवान/फिरकी गोलंदाज आहेत.त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात चढाओढ पाहायला मिळू शकते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग ईलेव्हन : फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हीड, कृणाल पांड्या, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा आणि जेकब डफी.

सनरायजर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : हेनरिक क्लासेन, ईशान किशन (कर्णधार), अनमोलप्रीत वर्मा, ट्रेव्हीस हेड, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, लियाम लिविंगस्टोन, हर्षल पटेल, जयदेव उनादकट, ब्रायडन कार्स आणि शिवम मावी.

Follow Us
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश