IND vs WI : Ruturaj Gaikwad ची टीम इंडियातील निवड वसीम जाफर यांना खटकली? ते काय म्हणाले?

IND vs WI : 'IPL खेळत नाही, म्हणून त्या दोघांकडे दुर्लक्ष केलं?' असं वसीम जाफर यांनी म्हटलय. वसीम जाफर यांनी टीमच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. टेस्ट टीमच्या निवडीबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न आहेत.

IND vs WI : Ruturaj Gaikwad ची टीम इंडियातील निवड वसीम जाफर यांना खटकली? ते काय म्हणाले?
Ruturaj Gaikwad-wasim jaffer
Image Credit source: ANI/Twitter
| Updated on: Jun 25, 2023 | 10:41 AM

मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या वनडे आणि टेस्ट टीमची घोषणा करण्यात आली आहे. आता टीमच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतय. देशातंर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या 2 खेळाडूंची निवड झालेली नाही. ते आयपीएलमध्ये खेळत नाहीत, म्हणून त्यांची निवड झाली नाही, असं आता बोलल जातय. माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी टीम सिलेक्शनवर आपलं मत मांडलय. त्यांनी 3 प्रश्न उपस्थित केलेत.

IPL खेळत नाहीत, म्हणून निवड नाही का?

“अभिमन्यू ईश्वरन आणि प्रियांक पांचाळ या दोघांनी रणजी आणि इंडिया ए कडून चांगल प्रदर्शन केलय. बऱ्याच काळापासून ते टेस्ट टीमचा दरवाजा ठोठवतायत. पण ते आयपीएल खेळत नाहीत, म्हणून त्यांची निवड केली नाही का? ऋतुराज गायकवाडने या रांगेत अचानक कशी झेप घेतली?” असे प्रश्न जाफर यांनी उपस्थित केलेत.


4 ओपनर्सची गरज काय?

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया 2 टेस्ट मॅचची सीरीज खेळणार आहे. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांची टेस्ट टीममध्ये निवड झाली आहे. सर्फराज खान, अभिमन्यू ईश्वरन, प्रियांक पांचाळसह काही खेळाडूंना वाट पाहावी लागेल. वसीम जाफर टेस्ट टीमच्या निवडीवर नाखूश आहेत. त्यांनी 4 ओपनर्सची गरज काय? म्हणून प्रश्न विचारलाय. सर्फराज खानला एक्स्ट्रा मिडिल ऑर्डर फलंदाज म्हणून निवडता आलं असतं. डोमेस्टिकमध्ये त्याच्या कामगिरीत सातत्य आहे.


सिलेक्टर्सवर पुन्हा प्रश्नचिन्ह

वसीम जाफर यांनी मोहम्मद शमीला आराम देण्यावरही आश्चर्य व्यक्त केलय. एक महिन्याचा मोठा ब्रेक असूनही शमीला आराम दिल्याबद्दल त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेत. शमी असा गोलंदाज आहे, त्याने जास्त गोलंदाजी केली, तर तो फिट राहील, फॉर्ममध्ये येईल. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड झाल्यानंतर सिलेक्टर्सवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालय.