
पाकिस्तान संघ आणि वाद हे काय आता नवीन राहिलं नाही. त्यात पाकिस्तानकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाण्यासारखं आहे. पाकिस्तान देशात रक्तातच खोटेपणा भिनलेला आहे. याची प्रचिती अनेकदा आली आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्येही फसवणुकीचा प्रकार काही नवीन नाही. वय कमी दाखवून पाकिस्तान संघात खेळण्याचा प्रकार सर्वश्रूत आहे. याबाबत अनेकदा आरोप प्रत्यारोप होत असतात. पण आता एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपूटने याबाबतचा धक्कादायक खुलासा केला आहे. 19 वर्षाखालील संघातील खेळाडू 17 किंवा 18 वर्षांचे असल्याचा दावा करतात, पण ते त्यापेक्षा मोठे असल्याचं धक्कादायक वास्तव माजी क्रिकेटपटूने उघड केलं आहे. पाकिस्तानने नुकताच अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धा जिंकली. त्यामुळे पुन्हा एकदा संशयाचं वारं घोंघावताना दिसत आहे. संघात खेळलेले खेळाडू खरंच 19 वर्षांखालील होते का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
माजी क्रिकेटपटू मोहम्मद आसिफने पाकिस्तानमधील अंडर 19 क्रिकेटचं वास्तव जगासमोर मांडलं आहे. त्याने हे वास्तव उघड करताना माजी कर्णदार शाहिद आफ्रिदीवरही दोषी असल्याचा आरोप केला आहे. एका मुलाखतीत अंडर 19 संघाबाबत बोलताना आसिफ म्हणाला की, ‘कागदावर पाकिस्तानी खेळाडू फक्त 17 आणि 18 वर्षांचे दिसतात. पण ते 27 ते 28 वर्षांचे असतात. शाहिद आफ्रिदी हा उत्तर उदाहरण आहे.’ माजी पाकिस्तानी अष्टपैलू आफ्रिदी त्याच्या वयामुळे अनेकदा टीकेचा धनी ठरला आहे. त्याचं वय कमी असल्याचं सांगत अनेक जण त्याची खिल्ली उडवतात. 1996 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा शाहीद आफ्रिदी आता 48 वर्षांचा आहे, हे वास्तव आहे.
क्रिकेटमध्ये वय कमी दाखवून खेळण्याचा प्रकार फक्त पाकिस्तानतच नाही तर दक्षिण आशिया देशात असंच चित्र आहे. भारतातही अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. यात वय कमी दाखवल्याचा आरोप केला गेला आहे. अफगाणिस्तान संघात तर खोटं वय दाखवून अनेक खेळाडू अंडर 19 संघात खेळतात. श्रीलंका आणि बांगलादेशमध्येही असंच चित्र आहे. त्यामुळे क्रिकेट बोर्ड आता त्याची गंभीर दखल घेताना दिसत आहेत.