Team India Coach : प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

राहुल द्रविडनंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा गौतम गंभीरच्या खांद्यावर आली आहे. बीसीसीआयने त्याच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा केली आहे. साडे तीन वर्षे या कार्यकाळ त्याला सांभाळावा लागणार आहे. प्रशिक्षकपदी निवड होताच गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे.

Team India Coach : प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
Gautam_Gambhir
| Updated on: Jul 09, 2024 | 8:51 PM

टीम इंडियाच्या प्रशिक्षपदावर अखेर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याची नियुक्ती झाली आहे. गौतम गंभीरच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी असणार आहे. राहुल द्रविडच्या कार्यकाळात टीम इंडियाने मैलाचा दगड गाठला. टीम इंडियाने अनेक चढउतार पाहिले. पण कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात टी20 वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरून ध्येय साध्य केलं. आता ही जबाबदारी गौतम गंभीरकडे असणार आहे. गौतम गंभीरला आयसीसी चषक मिळवून आणण्यासाठी साडे तीन वर्षांचा कालावधी मिळाला आहे. यात चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, आशिया कप, टी20 वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकप 2027 चा समावेश आहे. या साडेतीन वर्षात संघाची बांधणी करण्यापासून जेतेपद मिळवण्यापर्यंतचं काम करावं लागणार आहे. प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेताच गौतम गंभीर कामाला लागला आहे. त्याने सोशल मीडियावर भारतीय झेंडा ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

‘भारत ही माझी ओळख आहे, देशाची सेवा करणं हे माझ्या आयुष्यातील अभिमानाची बाब आहे. मला संघात वेगळ्या भूमिकेत पुनरागमन केल्याचा अभिमान वाटत आहे. प्रत्येक भारतीयाला हेवा वाटवा हेच माझं ध्येय आहे. 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्न निळी जर्सी परिधान केलेल्या खेळाडूंच्या खांद्यावर आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सर्वकाही पणाला लावेन. ‘, असं गौतम गंभीरने ट्वीट करून सांगितलं आहे.


गौतम गंभीरने भारतासाठी 58 कसोटी, 147 वनडे आणि 37 टी20 सामने खेळलं आहे. गौतम गंभीरचं वय 42 असून त्याने 4 डिसेंबर 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. गौतम गंभीरने 2016 साली इंग्लंडविरुद्ध 2016 साली शेवटची कसोटी खेळली होती. गौतम गंभीरने कसोटीत 41.95 च्या सरीसरीने 4154 धावा केल्या. तर वनडेत 39.68 च्या सरासरीने 5238 धावा केल्या आहेत. तर टी20 क्रिकेटमध्ये 27.41 च्या सरासरीने 932 धावा केल्या आहेत. वनडे वर्ल्डकप 2011 मध्ये गौतम गंभीरने खेळलेली 97 धावांची खेळी क्रीडाप्रेमींच्या स्मरणात राहणारी आहे.