12 चेंडूत एक रन्स दिला नाही, थेट हॅट्रिक, 73 सेंच्युरी मारणारा दिग्गजही फसला, पहा VIDEO

जबरदस्त गोलंदाजी चुकवू नका, एकदा Hattrick चा VIDEO बघा

12 चेंडूत एक रन्स दिला नाही, थेट हॅट्रिक, 73 सेंच्युरी मारणारा दिग्गजही फसला, पहा VIDEO
CountyImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 6:52 PM

मुंबई: इंग्लंडमध्ये सध्या काऊंटी चॅम्पियनशिप डिविजने वनचे सामने सुरु आहेत. या मॅचमध्ये लँकेशायरचा वेगवान गोलंदाज जॉर्ज बॅल्डरसनने कमाल केली. बॅल्डरसनने एसेंक्स विरुद्ध हॅट्रिक घेतली. जॉर्जने दुसऱ्याडावात सलग तीन चेंडूंवर तीन विकेट घेतले. त्यामुळे एसेक्सची टीम बॅकफूटवर गेली. एसेक्सला लँकेशायर विरुद्ध विजयासाठी 98 धावांची आवश्यकता आहे. बॅल्डरसनने प्रतिस्पर्धी टीमच्या टॉप ऑर्डरला हलवून टाकलं.

अशी घेतली हॅट्रिक

बॅल्डरसनच्या या हॅट्रिकच वैशिष्टय म्हणजे त्याने एलिस्टर कुकची पहिली विकेट घेतली. कुकला बॅल्डरसनने बोल्ड केलं. कुकने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 73 शतकं ठोकली आहेत. बॅल्डरसनच्या चेंडूच कुककडे कुठलही उत्तर नव्हतं. त्यानंतर बॅल्डरसनने डॅन लॉरन्सला आऊट केलं. लॉरेन्सने फुलटॉस चेंडूवर विलियम्सकडे झेल सोपवला. त्यानंतर मॅट क्रिचलेला बॅल्डरसनने क्लीन बोल्ड करुन हॅट्रिक पूर्ण केली.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

बॅल्डरसनच्या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बॅल्डरसनने पहिल्या 2 ओव्हरमध्येच हॅट्रिक घेतली. त्याने 12 चेंडूत एक रन्सही दिला नाही. बॅल्डरसनने या सीजनमध्ये आतापर्यंत 10 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत. हॅट्रिक घेऊन त्याने सीजनला संस्मरणीय बनवलं.

कोण आहे बॅल्डरसन?

जॉर्ज बॅल्डरसन 21 वर्षांचा ऑलराऊंडर आहे. त्याचा जन्म 11 ऑक्टोबर 2000 साली मँचेस्टरमध्ये झाला होता. तो अंडर 19 मध्ये इंग्लंडचा कॅप्टन होता. बॅल्डरसन 20 फर्स्ट क्लास सामने खेळलाय. यात 3 हाफ सेंच्युरी त्याच्या नावावर आहेत. लिस्ट ए मध्ये बॅल्डरसनच्या नावावर एक सेंच्युरी सुद्धा आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.