स्टार खेळाडूची क्रिकेटच्या मैदानावर हेलिकॉप्टरने ग्रँड एन्ट्री, लग्न आटपून थेट मैदानावर

क्रिकेटच्या मैदानावर कोणीच आतापर्यंत इतकी ग्रँड एन्ट्री घेतली नसेल. कारण त्याला भावाचे लग्न आटोपून थेट क्रिकेटच्या मैदानावर खेळण्यासाठी लवकर पोहोचायचे होते. म्हणून त्याने थेट हेलिकॉप्टरने येण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणीच अशी एन्ट्री घेतली नव्हती.

स्टार खेळाडूची क्रिकेटच्या मैदानावर हेलिकॉप्टरने ग्रँड एन्ट्री, लग्न आटपून थेट मैदानावर
| Updated on: Jan 12, 2024 | 1:46 PM

सिडनी : क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही कधी कोणत्या खेळाडूला हेलिकॉप्टरने एन्ट्री घेताना पाहिलं नसेल. ऑस्ट्रेलिया असं घडलं आहे. बिग बॅश लीग 2023-24 मध्ये, सिडनी थंडर आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात 34 वा सामन्या दरम्यान खेळाडूने हेलिकॉप्टरने ग्रँड एन्ट्री घेतली. या सामन्यात खेळण्यासाठी सिडनी थंडर संघाचा भाग असलेला डेव्हिड वॉर्नर सामना सुरू होण्यापूर्वी थेट हेलिकॉप्टरने सिडनीच्या मैदानावर उतरला. क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत कोणत्याही खेळाडूने सामन्याच्या आधी मैदानावर अशी भव्य एंट्री केली नव्हती, पण असे करून वॉर्नरने नक्कीच सर्वांसाठी एक नवीन ट्रेंड सेट केला आहे.

वॉर्नरच्या या ग्रँड एन्ट्रीचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याच्या भावाचे लग्न, ज्यात सहभागी झाल्यानंतर तो या सामन्यात खेळण्यासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाला जेणेकरून तो सामना सुरू होण्यापूर्वी स्टेडियममध्ये पोहोचू शकेल.

वॉर्नरची ग्रँड एन्ट्री

डेव्हिड वॉर्नरच्या हा ग्रँड एन्ट्रीचा व्हिडिओ बीबीएलच्या अधिकृत पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. वॉर्नरची एन्ट्री खूपच भारी होती. मैदानावर उतरल्यानंतर वॉर्नरने चॅनल 7  सोबत बोलताना म्हटले की, ही राइड खूप छान होती. वरून सिडनी पाहणे हा एक वेगळाच आनंद आहे. वॉर्नरला त्याच्या निवृत्तीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, या मैदानावरील माझ्यासाठी शेवटचा आठवडा खूप खास होता. ज्या संघात आम्ही विश्वचषक आणि कसोटी चॅम्पियनशिप जिंकली त्या संघासाठी गेले 18 महिने खूप छान होते, असे मी यापूर्वीही म्हटले आहे. अजून २ कसोटी सामने खेळायचे आहेत पण मला आता त्याची फारशी चिंता नाही.

डेव्हिड वॉर्नरची कारकिर्द

डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका सुरू झाल्यानंतर सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी कसोटी तसेच एकदिवसीय फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याला आता टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्यावर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे. वॉर्नरच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 112 टेस्टमध्ये 8786 धावा आणि 161 वनडे सामन्यांमध्ये 6932 धावा केल्या आहेत. या काळात वॉर्नरने कसोटीत 26 आणि एकदिवसीय सामन्यात 22 शतके झळकावली आहेत.