
आयपीएल 2025 स्पर्धच्या एलिमिनेटर फेरीत मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला 20 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 228 धावा केल्या. मुंबईसाठी रोहित शर्मा याने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईने गुजरातसमोर विजयासाठी 229 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांसमोर गुजरात टायटन्सला 208 धावांपर्यंतच पोहचचा आलं. मुंबई इंडियन्सने या विजयासह क्वॉलिफायर 2 मध्ये एन्ट्री मारली आहे. क्वॉलिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्स पंजाब किंग्स विरुद्ध भिडणार आहे. हा सामना 1 जून रोजी होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत धडक मारेल. अंतिम फेरीत आरसीबीशी लढत होईल. अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेच्या एलिमिनेटर फेरीत मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला धावांनी पराभूत केलं. मुंबई इंडियन्सने 228 धावा करत विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं होतं. शेवटच्या दोन षटकात 12 चेंडूत 36 धावांची गरज होती. पण बोल्टने हे षटक जबरदस्त टाकलं आणि शेवटच्या षटकात 24 धावा ठेवल्या. गुजरात टायटन्सला शेवटच्या षटकात फक्त 4 धावा करता आल्या. यासह मुंबई इंडियन्सने गुजरातचा 20 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्सने क्वॉलिफायर 2 फेरीत एन्ट्री मारली आहे. क्वॉलिफायर पंजाब किंग्सशी लढत होणार आहे. या सामन्यात विजयी संघ अंतिम फेरीत आरसीबी दोन हात करणार आहे.
गुजरात टायटन्सला 12 चेंडूत 36 धावांची गरज होती. बोल्टने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर रदरफर्डने जोरदार फटका मारला. पण सीमा पार काही होऊ शकला नाही. तिलक वर्माने त्याचा अप्रतिम झेल पकडला. रदरफर्ड झेलबाद होत तंबूत परतला.
साई सुदर्शन आऊट झाल्यानंतर सामना आता बरोबरीत आला आहे. गुजरातने 16 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 175 रन्स केल्या आहेत. त्यामुळे गुजरातला विजयासाठी 24 बॉलमध्ये आणखी 54 रन्सची गरज आहे. मैदानात शेरफेन रुदरफोर्ड आणि राहुल तेवतिया ही नवी जोडी खेळत आहे.
मुंबईने सामन्यात निर्णायक क्षणी कमबॅक केलं आहे. रिचर्ड ग्लीसन याने त्याच्या पहिल्या आयपीएल सामन्यात महत्त्वाच्या क्षणी गुजरात टायटन्सचा सेट बॅट्समन साई सुदर्शन याला क्लिन बोल्ड केलंय. गुजरातने यासह चौथी विकेट गमावली आहे. साईने 49 बॉलमध्ये 81 रन्स केल्या. साईने या खेळीत 10 फोर आणि 1 सिक्स लगावला.
गुजरात टायटन्सने 15 ओव्हरनंतर 229 रन्सचा पाठलाग करताना 3 आऊट 161 रन्स केल्या आहेत. त्यामुळे गुजरातला विजयासाठी 30 बॉलमध्ये 68 रन्सची गरज आहे. साई सुदर्शन हा 80 धावांवर तर शेरफन रुदरफोर्ड 8 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे. त्यामुळे मुंबईला हा सामना जिंकायचा असेल तर साईला आऊट करण्याशिवाय पर्याय नाही.
अखेर जसप्रीत बुमराह यानेच गुजरातची जमलेली वॉशिंग्टन सुंदर आणि साई सुदर्शन सेट जोडी फोडली आहे. बुमराहने कडक यॉर्करवर वॉशिंग्टन सुंदर याला क्लिन बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. वॉशिंग्टनने 24 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने 48 रन्स केल्या. वॉशिंग्टनने या खेळीत 3 सिक्स आणि 5 फोर लगावले.
साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर जोडीने पूर्णपणे खेळ बदलला आहे. या दोघांनी केलेल्या नाबाद अर्धशतकी भागीदारीमुळे गुजरात या सामन्यात विजयाच्या दिशेने अग्रेसर आहे. गुजरातने 229 धावांचा पाठलाग करताना 13 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 148 रन्स केल्या आहे. साई 77 तर वॉशिंग्टन सुंदर 47 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. त्यामुळे मुंबईला सामन्यात कायम रहायचं असेल तर इथून 2 विकेट्स घ्याव्या लागतील.
गुजरात टायटन्सला विजयासाठी 48 बॉलमध्ये आणखी 99 धावांची गरज आहे. साई सुदर्शन 42 बॉलमध्ये 76 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे. तर वॉशिंग्टन सुंदर 18 चेंडूत 31 धावांवर नाबाद खेळत आहे. गुजरातने 12 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 130 रन्स केल्या आहेत. त्यामुळे मुंबईला हा सामना जिंकायचा असेल तर कोणत्याही स्थितीत ही सेट जोडी फोडावी लागणार आहे.
गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने अर्धशतकी खेळी केली. त्याने 28 चेंडूत 52 धावांची खेळी केली. त्याच्या आक्रमक खेळीमुळे मुंबई इंडियन्सची धाकधूक वाढली आहे. साई सुदर्शन जबरदस्त फॉर्मात आहे.
गुजरात टायटन्सला कुसल मेंडिसच्या रुपाने दुसरा धक्का बसला आहे. पॉवर प्लेनंतर सँटनर गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फटका मारताना हिटविकेट झाला. 20 धावा करून तंबूत परतला.
गुजरात टायटन्सने पॉवर प्लेच्या सहा षटकात 1 गडी गमवून 66 धावांची खेळी केली. शुबमन गिल स्वस्तात बाद झाल्यानंतर साई सुदर्शनने मोर्चा सांभाळला. त्याने 25 चेंडूत 43 धावांची खेळी केली.
गुजरात टायटन्सने 4 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 41 रन्स केल्या आहेत. साई सुदर्शन 15 चेंडूत 23 धावांवर नाबाद खेळत आहे. तर कुसल मेंडीस याने 7 बॉलमध्ये नॉट आऊट 15 रन्स केल्या आहेत. गुजरातला विजयासाठी 16 ओव्हरमध्ये आणखी 188 धावांची गरज आहे.
ट्रेंट बोल्ट याने गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला आणि मोठा झटका दिला आहे. बोल्टने पहिल्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर शुबमन गिल याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. शुबमन 1 रन करुन माघारी परतला.
गुजरात विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यातील दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. मुंबईने गुजरातसमोर 229 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. गुजरातकडून साई सुदर्शन आणि कॅप्टन शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली आहे. गुजरातला जिंकायचं असेल तर या सलामी जोडीला निर्णायक योगदान द्यावं लागणार आहे. त्यामुळे ही जोडी किती धावांची भागीदारी करते? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात साजेशी खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 गडी गमवून 228 धावा केल्या. तसेच विजयासाठी 22 धावांचं आव्हान दिलं. रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. तर रोहित शर्माने 81 धावांची खेळी करत गुजरात टायटन्सला बॅकफूटवर ढकललं. तर हार्दिक पांड्याने शेवटी षटकात जबरदस्त फटकेबाजी केली.
गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला पाचवा झटका दिला आहे. राशीद खान याने बाउंड्री लाईनवर नमन धीर याचा अप्रतिम कॅच घेतला आहे. प्रसिध कृष्णा याने नमन धीर याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. नमनने 6 बॉलमध्ये 9 रन्स केल्या. नमनने या खेळीत 1 सिक्स लगावला.
गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला झटपट 2 झटके दिले आहेत. गुजरातने रोहित शर्मा याच्यानंतर आता तिलक वर्मा याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. तिलकने 11 बॉलमध्ये 25 रन्स केल्या. तिलकने या खेळीत 3 षटकार लगावले. तिलकने 227.27 च्या स्ट्राईक रेटने या 25 रन्स केल्या.
मुंबई इंडियन्सने तिसरी विकेट गमावली आहे. रोहित शर्मा याने गुजरात टायटन्स विरुद्ध निर्णायक सामन्यात मोठी खेळी केली. रोहितने 50 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 9 फोरसह 162 च्या स्ट्राईक रेटने 81 रन्स केल्या.
मुंबई इंडियन्सला दुसरा झटका लागला आहे. जॉनी बेयरस्टो याच्यानंतर सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. मात्र आताही सूर्याने 25 पेक्षा अधिक धावा करण्याच रेकॉर्ड कायम ठेवला आहे. सूर्याने 20 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 1 फोरसह 33 रन्स केल्या. सूर्या आणि रोहित या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 59 रन्सची पार्टनरशीप केली.
रोहित शर्मा याने एलिमिनेटर या निर्णायक आणि आरपारच्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध वादळी अर्धशतकी खेळी केली आहे. रोहितने 28 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 7 फोरच्या मदतीने हे अर्धशतक झळकावलं. रोहितने हे अर्धशतक 178.57 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावलं.
साई किशोर याने मुंबईची सेट झालेली रोहित आण जॉनी सेट जोडी फोडली आहे. जॉनीने 8व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर फटका मारला. जॉनीने मारलेला फटका पाहताच साई सुदर्शन याने डाव्या बाजूला उडी घेत कॅच घेण्याचा प्रयत्न केला. मात्र साईला यात यश आलं नाही. मात्र साईने बॉल गेराल्ड कोएत्झीला पास दिला. गेराल्डने अशाप्रकारे अप्रतिम रिले कॅच घेतला. जॉनीने 22 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 फोरसह 47 रन्स केल्या.
रोहित शर्मा आणि जॉनी बेयरस्टो या सलामी जोडीने मुंबईला अपेक्षेप्रमाणे चाबूक आणि विस्फोटक सुरुवात करुन दिली आहे. रोहित-बेयरस्टो जोडीने पावरप्लेचा पूर्ण फायदा घेत 6 ओव्हरमध्ये 79 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. रोहितला या दरम्यान 2 जीवनदान मिळाले. रोहितने या जीवनदानाचा फायदा घेतला. रोहित 33 आणि जॉनी 44 धावांवर नाबाद खेळत आहे.
मुंबई इंडियन्सचा बॅट्समन रोहित शर्मा याचं नशिब आज जोरात आहे, असंच म्हणावं लागेल. रोहितला काही चेंडूत दुसऱ्यांदा जीवनादान मिळालंय. जेराल्ड कोएत्झी याने सामन्यातील दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहितचा कॅच सोडला. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये विकेटकीपर कुसल मेंडीस याने सोपा कॅच सोडला. रोहितला अशाप्रकारे दुसऱ्यांदा जीवनदान मिळालंय. रोहितला 3 आणि 12 धावांवर जीवनदान मिळालं.
गुजरात टायटन्सच्या जेराल्ड कोएत्झी याने निर्णायक आणि अतिशय महत्त्वाच्या सामन्यात घोडचूक केली आहे. जेराल्डने मुंबई इंडिन्यसचा बॅट्समन रोहित शर्मा याचा कॅच सोडून त्याला जीवनदान दिलं आहे. रोहितने दुसऱ्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर जोरदार फटका मारला. मात्र रोहितने मारलाल फटका उंच गेला. बॉलखाली जेराल्ड कोएत्झी होता. मात्र जेराल्डने कॅच सोडला. त्यामुळे रोहितने 1 धाव घेतली तसेच त्याला जीवनदानही मिळालं. आता गुजरातला ही चूक किती महागात पडते? हे काही ओव्हरनंतर स्पष्ट होईल.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबईकडून रोहित शर्मा आणि जॉनी बेयरस्टो ही सलामी जोडी मैदानात आली आहे. तर गुजरातकडून मोहम्मद सिराज सामन्यातील पहिली ओव्हर टाकत आहे. मुंबईची सलामी जोडी पलटणला कशी सुरुवात करुन देते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेयर: कृष्णन श्रीजीथ, रघु शर्मा, रॉबिन मिन्झ, अश्वनी कुमार, रीस टोपली.
गुजरात टायटन्स इम्पॅक्ट प्लेयर: शेरफेन रदरफोर्ड, अनुज रावत, महिपाल लोमरोर, जयंत यादव, अर्शद खान.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुसल मेंडिस (विकेटकीपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
शुबमन गिल म्हणाला की, ‘आम्ही पाठलाग केला असता. जर कोणी हंगामाच्या सुरुवातीलाच म्हटले असते की आम्ही पात्र ठरलो असतो, तर आम्ही ते स्वीकारले असते. चंदीगडमध्ये परत येऊ शकल्याने मुले खूप उत्साहित आहेत, ते माझे घरचे शहर आहे. हा सामना आमच्यासाठी वेगळा नाही, नॉकआउट सामन्याचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा दबाव नाही. दोन बदल आहेत. बटलरऐवजी मेंडिस आणि अर्शदऐवजी वॉशिंग्टन आहे.
हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘आम्ही फलंदाजी करणार आहोत. कालपेक्षा वेगळा ट्रॅक दिसतोय. थोडे गवत कमी आहे. मोठा खेळ, धावा करणे आणि बचाव करणे छान होईल. आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 9 सामन्यांपासून आपण नॉकआउटसारखे खेळत आहोत. आज खरोखरच खेळायला हवे आणि आपण ज्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो त्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. आपल्याकडे तीन बदल आहेत. जॉनी बेअरस्टो आहे. ग्लीसन आणि राज अंगद बावा खेळणार आहे.’
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एलिमिनेटर फेरीचा सामना होत आहे. या सामन्यात विजयी संघ क्वॉलिफायर 2 फेरीत पंजाब किंग्सशी सामना करणार आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्सचा स्टार बॅट्समन आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याला गुजरात टायटन्स विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात मोठा कारनामा करण्याची संधी आहे. रोहितला आयपीएलमध्ये षटकारांचं त्रिशतक करण्याची संधी आहे. रोहितने आयपीएलमध्ये 298 षटकार लगावले आहेत. त्यामुळे रोहित गुजरात विरुद्ध हा कारनामा करणार का? याकडे पलटणच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. मुल्लानपूरमधील पहिल्या डावातील एव्हरेज स्कोअर हा 159 असा आहे. त्यामुळे कोणता संघ टॉस जिंकून काय निर्णय घेतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघांची ही आमनेसामने येण्याची आठवी वेळ असणार आहे. याआधी झालेल्या 7 सामन्यांमध्ये गुजरात मुंबईवर वरचढ राहिली आहे. गुजरातने मुंबई विरुद्ध 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर मुंबईला फक्त 2 सामन्यांमध्येच जिंकता आलं आहे.
आयपीएल 2025 एलिमिनेटर निमित्ताने गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स दोन्ही संघांची आयपीएल 2025 मध्ये आमनेसामने येण्याची तिसरी वेळ ठरणार आहे. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत 2 वेळ आमनेसामने आले होते. गुजरातने या साखळी फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईवर मात केली होती. त्यामुळे मुंबई एलिमिनेटरमध्ये विजय मिळवत गुजरातचा हिशोब करणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्स टीम: रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, चरिथ असलंका, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, अश्वनी कुमार, कर्ण शर्मा, राज बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, रॉबिन मिन्झ, अर्जुन तेंडुलकर, रघु शर्मा, कृष्णन श्रीजीथ, मुजीब उर रहमान, रिचर्ड ग्लीसन आणि रीस टोपली.
गुजरात टायटन्स टीम: शुबमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, कुसल मेंडिस (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, जेराल्ड कोएत्झी, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, अनुज रावत, महिपाल लोमरोर, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, जयंत यादव, दासून शनाका, करीम जनात, कुलवंत खेजरोलिया, मानव सुथार, कुमार कुशाग्रा, गुरनूर ब्रार आणि निशांत सिंधू.
मुंबई इंडियन्ससमोर एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचं आव्हान आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. हा सामना मुल्लानपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. विजेता संघ पुढील फेरीत पोहचेल. तर पराभूत संघाचं आव्हान संपुष्ठात येईल. त्यामुळो दोन्ही संघात जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे.