IND vs SA: पुजारा-रहाणेसाठी अय्यर-विहारीचा बळी देणार, राहुल द्रविडने दिले संकेत

| Updated on: Jan 07, 2022 | 7:54 PM

संघातील जे वरिष्ठ खेळाडू आहेत, त्यांनाही वाट पाहावी लागली होती. त्यांनीही करीयरच्या सुरुवातीला खूप धावा केल्या होत्या, असे सूचक वक्तव्य द्रविडने केलं.

IND vs SA: पुजारा-रहाणेसाठी अय्यर-विहारीचा बळी देणार, राहुल द्रविडने दिले संकेत
रवी शास्त्रीनंतर भारतीय संघाचा हेड कोच म्हणून जबाबदारी सांभाळणारा राहुल द्रविड (Rahul Dravid) संघात काय बदल करतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशावेळी द्रविडच्या मते विराटनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार व्हावा, असं इंडियन एक्सप्रेसमध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.
Follow us on

जोहान्सबर्ग: भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यानंतर आता टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराचे समर्थन केले आहे. शक्य होईल तेवढं, या दोघांना मला संघात ठेवायचं आहे, असं जोहान्सबर्ग कसोटीनंतर राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे. द्रविड यांच्या या वक्तव्यामुळे संघात स्थान मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी या दोघांना आणखी जास्त काळ वाट पाहावी लागू शकते. (hanuma vihari and shreyas iyer might have to wait for chance with seniors around indicates rahul dravid)

पोट बिघडलं आणि विहारीला संधी मिळाली
दुसऱ्य़ा कसोटीत आपल्या फलंदाजीने लक्ष वेधून घेणाऱ्या हनुमा विहारीने आपल्या 13 कसोटी सामन्यांपैकी फक्त एक सामना स्वदेशात खेळला आहे. विराट कोहलीची पाठिची दुखापत आणि श्रेयस अय्यरचं पोट खराब झाल्यामुळे हनुमा विहारीला दुसऱ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. त्याने दुसऱ्याडावात संघाला गरज असताना नाबाद 40 धावांची खेळी करुन आपली उपयुक्ततता सिद्ध केली.

द्रविडने हनुमा विहारीचं केलं कौतुक
हेड कोच राहुल द्रविड यांनी हनुमा विहारीचं कौतुक केले. सर्वप्रथम मी हे सांगेन की, “विहारीने दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली. पहिल्या डावात नशिबाने त्याला साथ दिली नाही. दुसऱ्याडावात खूप चांगली फलंदाजी करुन संघाचं मनोधैर्य वाढवलं”. मधल्याफळीतील दुसरा फलंदाज श्रेयस अय्यरचंही राहुलने कौतुक केलं.

वरिष्ठ खेळाडूंनीही वाट पाहिली होती
संघातील जे वरिष्ठ खेळाडू आहेत, त्यांनाही वाट पाहावी लागली होती. त्यांनीही करीयरच्या सुरुवातीला खूप धावा केल्या होत्या, असे सूचक वक्तव्य द्रविडने केलं.