माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगला कोरोनाची लागण, दिग्गज फिरकीपटू घरीच क्वारंटाईन

| Updated on: Jan 21, 2022 | 1:18 PM

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगची (Harbhajan Singh) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना (Covid-19) टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारताच्या या माजी फिरकीपटूने स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगला कोरोनाची लागण, दिग्गज फिरकीपटू घरीच क्वारंटाईन
Harbhajan Singh
Follow us on

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगची (Harbhajan Singh) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना (Covid-19) टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारताच्या या माजी फिरकीपटूने स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले आहे. हरभजन सिंगने त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना टेस्ट करुन घेण्यास सांगितले आहे. भज्जीने ट्विट केले आहे की, “त्याला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत आणि तो घरीच क्वारंटाईन होऊन आवश्यक ती खबरदारी घेत आहे.”

हरभजन सिंगने गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी सोशल मीडियावरुन निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्तीच्या वेळी त्याने भविष्यात पंजाबची सेवा करायची असल्याचे सांगितले होते. मात्र, तो ही सेवा कशी करणार आहे, याचा खुलासा त्याने केला नाही.

कोरोनाची सौम्य लक्षणं

कोरोना झाल्यानंतर भज्जीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणे आहेत. मी स्वतःला घरीच क्वारंटाइन केले आहे आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी लवकरच चाचणी करून घेण्याचे आवाहन करेन. कृपया सुरक्षित रहा आणि काळजी घ्या.”

हरभजनची क्रिकेट कारकीर्द

2016 मध्ये यूएई विरुद्धच्या टी-20 सामन्यात हरभजनने शेवटचे भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर तो फक्त देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत होता. हरभजन सिंगने भारताकडून खेळताना नेहमीच दमदार कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 103 सामन्यात 417 विकेट घेतल्या आहेत, तर 236 वनडे सामन्यात 227 विकेट त्याच्या नावावार आहेत. टी-20 या क्रिकेटच्या छोट्या फॉर्मेटमध्ये हरभजनने 28 सामन्यात 25 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये हरभजन आतापर्यंत 13 सीझनमध्ये 163 सामने खेळला आहे. 2020 च्या मोसमात तो मैदानात दिसला नव्हता. 26 च्या सरासरीने त्याने तिथे 150 विकेट घेतल्या आहेत. 18 धावात 5 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

इतर बातम्या

IND vs SA 2nd ODI LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहाल सामना

Road Safety World Series च्या आयोजकांनी सचिन तेंडुलकरचे पैसे खाल्ले, मास्टर ब्लास्टरने घेतला मोठा निर्णय

(Harbhajan Singh tested Covid-19 positive, quarantines himself at home)