IND vs SA 2nd ODI LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहाल सामना

IND vs SA 2nd ODI LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहाल सामना

या वनडे मालिकेच्या निमित्ताने केएल राहुलची कर्णधार म्हणून क्षमता तपासली जाईल. पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतावर 31 धावांनी विजय मिळवला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 21, 2022 | 7:00 AM

पार्ल: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Ind vs sa) आज पार्लमध्ये दुसरी वनडे मॅच आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याच्याजागी केएल राहुल वनडेमध्ये नेतृत्व करत आहे. या वनडे मालिकेच्या निमित्ताने केएल राहुलची कर्णधार म्हणून क्षमता तपासली जाईल. पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतावर 31 धावांनी विजय मिळवला.

कसोटी मालिका 2-1 अशी जिंकल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. पहिल्या वनडेमध्ये वेंकटेश अय्यरला गोलंदाजी दिली नव्हती. त्यामुळे दुसऱ्यावनडेमध्ये वेंकटेश अय्यरला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला आणखी वाट पहावी लागू शकते. शिखर धवनसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. पहिल्या वनडेमध्ये त्याने दमदार 79 धावांची खेळी केली होती.

भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यजुवेंद्र चहल, आर.अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पहिली वनडे कधी आहे? भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पहिली वनडे आज 19 जानेवारी 2022 रोजी आहे. तीन सामन्यांची ही सीरीज आहे.

पहिली वनडे किती वाजता सुरु होणार? बुधवारी भारतीय वेळेनुसार पहिली वनडे दुपारी 2 वाजता सुरु होईल. टॉस दुपारी 1.30 वाजता होईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पहिली वनडे कुठे आहे? पार्लच्या बोलँड पार्कवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिली वनडे आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या पहिल्या वनडेचं कुठे प्रेक्षपण होणार आहे? भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या तीन मॅचच्या वनडे सीरीजचं स्टार स्पोटर्सवर वर लाइव्ह प्रक्षेपण होणार आहे.

पहिल्या वनडेचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल? हॉटस्टारवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या पहिल्या वनडेचं लाइव्ह स्ट्रीमिंग होईल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें