
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाला विजेतं बनवण्यात हार्दिक पंड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने बॅट आणि बॉलने महत्त्वाच योगदान दिलं. गरज असताना टीमसाठी धावा बनवल्या आणि गरज असताना टीमला विकेट काढून दिल्या. एकदम परफेक्ट ऑलराऊंडरचा रोल त्याने निभावला. किताब जिंकल्यानंतर त्याने पाकिस्तानी पत्रकारांच्या प्रश्नांना सुद्धा उत्तर दिली. “जिथे आव्हान मोठी असतात, तिथे सर्वात जास्त मेहनत करण्याची आवश्यकता असते. आव्हानांना घाबरुन घरी निघून गेलो, तर त्याने काही होणार नाही” असं हार्दिक पंड्या विजयानंतर म्हणाला.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर हार्दिक पंड्या पत्रकार परिषदेत आला. त्यावेळी त्याला पहिला प्रश्न एका पाकिस्तानी पत्रकाराने विचारला. “सर, तुम्हाला सर्वप्रथम विजयासाठी शुभेच्छा. माझा प्रश्न आहे की, टीम इंडिया जितके सामने दुबईत खेळली, त्या सर्व मॅच त्यांनी जिंकल्या, प्रत्येक सामन्यात प्रेक्षक भरपूर असायचे. पाकिस्तानी जनतेची इच्छा होती की, भारताने तिथे येऊन खेळावं. तिथे सुद्धा तुमचे भरपूर चाहते आहेत, या बद्दल काय सांगाल?”
‘पण असं होऊ शकलं नाही’
या प्रश्नावर उत्तर देताना हार्दिक पंड्या म्हणालाा की, “बढिया आहे सर, त्यांची इच्छा होती. पण असं होऊ शकलं नाही. मला विश्वास आहे, इथे जितके पाकिस्तानी नागरिक आहेत, त्यांनी सुद्धा एन्जॉय केलं असेल. आता पाकिस्तानात का गेलो नाही, यावर बोलणं हे माझ्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे”
‘तेव्हा जास्त मेहनत करायला मजा येते’
हार्दिक पंड्या म्हणाला की, “जेव्हा आव्हानाची स्थिती असते, तेव्हा जास्त मेहनत करायला मजा येते” “आव्हान कठीण असेल, तर लढत रहा. घरी जाल, रडत बसाल तर त्याने काही होणार नाही. फिल्डिंगमध्ये मी बरच काही शिकलोय. झेप घ्याल तर बॉल रोखू शकता, अन्यथा पहात बसावं लागेल” असं हार्दिक पंड्या म्हणाला.
‘…तर तुमच्यावर दुसरे कसा भरवसा ठेवतील’
“जर मी बॉलिंग चांगली करत असेन, तर बॅटिंगमध्ये काही अडचण नाही. मी नेहमी म्हणत असतो की, तुम्ही स्वत:वर भरवसा ठेऊ शकत नसाल, तर दुसरे कसे ठेवतील? म्हणून मी नेहमी स्वत:वर भरोसा ठेवलाय. तुम्ही जी मेहनत करता ती मॅचमध्ये दिसते” असं हार्दिक पंड्या म्हणाला.