IND vs NZ : ट्रॉफी स्वीकारल्यानंतर Hardik pandya ची अनपेक्षित कृती, पृश्वी शॉ ला आश्चर्याचा धक्का, VIDEO

| Updated on: Feb 02, 2023 | 12:08 PM

IND vs NZ 3rd T20 : हार्दिकने हा पुरस्कार भारताच्या युवा संघाला समर्पित केला, ज्यांनी 1-0 पिछाडीवरुन ही सीरीज जिंकली. हार्दिकने चार टी 20 सीरीजमध्ये टीम इंडियाच नेतृत्व केलय.

IND vs NZ : ट्रॉफी स्वीकारल्यानंतर Hardik pandya ची अनपेक्षित कृती, पृश्वी शॉ ला आश्चर्याचा धक्का, VIDEO
Hardik-Prithvi
Image Credit source: bcci twitter
Follow us on

IND vs NZ 3rd T20 : टीम इंडियाने काल न्यूझीलंड विरुद्ध तिसरा T20 सामना जिंकला. टीम इंडियाने या सामन्यासह मालिका जिंकली. प्रेझेंटेशनच्यावळी हार्दिकच नाव प्लेयर ऑफ द सीरीजच्या पुरस्कारासाठी पुकारण्यात आलं, तेव्हा हार्दिकला आश्चर्याचा धक्का बसला. कारण या तीन टी 20 सामन्याच्या सीरीजमध्ये त्याने विशेष अशी कामगिरी केलेली नाहीय. फक्त कॅप्टन म्हणून आणि पावरप्लेमध्ये बॉलर म्हणून त्याने मैदानावर महत्त्वपूर्ण योगदान दिलय. हार्दिकने हा पुरस्कार भारताच्या युवा संघाला समर्पित केला, ज्यांनी 1-0 पिछाडीवरुन ही सीरीज जिंकली. हार्दिकने चार टी 20 सीरीजमध्ये टीम इंडियाच नेतृत्व केलय. या चारही सीरीज टीम इंडियाने जिंकल्या आहेत.

मला जबाबदारी घ्यायला आवडते

“आयुष्य आणि कॅप्टनशिपबद्दल माझा खूप साधा, सोपा नियम आहे. मी खाली गेलो, तर माझ्या निर्णयाने जाईन. मी माझे निर्णय स्वत: घेतो. मला जबाबदारी घ्यायला आवडते. प्रेशर असलेले सामने नॉर्मल पद्धतीने, कुठलाही दबाव न घेता खेळायचे आहेत. मोठ्या स्टेजवर अजून चांगली कामगिरी करु, अशी अपेक्षा आहे” सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हार्दिक हे म्हणाला. टीम इंडियाने न्यूझीलंडवर 168 धावांनी विजय मिळवला. टी 20 फॉर्मेटमधील टीम इंडियाचा हा मोठा विजय आहे.


हार्दिकच्या कृतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

प्रेझेंटेशनवेळी विजयी ट्रॉफी स्वीकारताना हार्दिकच्या कृतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ट्रॉफी स्वीकारल्यानंतर हार्दिकने ती ट्रॉफी नेऊन थेट पृथ्वी शॉ च्या हातात दिली. पृथ्वी शॉ ची या सीरीजमध्ये बरीच चर्चा होती. पण त्याला एकाही मॅचमध्ये संधी मिळाली नाही. पृथ्वी सुद्धा हार्दिककडून ट्रॉफी स्वीकारताना आनंदी होता. रणजीत ट्रिपल सेंच्युरी ठोकून पृथ्वी टीम इंडियात दाखल झाला होता. त्याला एकाही मॅचमध्ये संधी दिली नाही. म्हणून हार्दिकवर बरीच टीका झाली होती.

शुभमन गिलवरच विश्वास ठेवला

टीम इंडियाच्या विजयात ओपनर शुभमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 63 चेंडूत नाबाद 126 धावा फटकावल्या. आपल्या शतकी खेळीत शुभमनने 12 फोर आणि 7 सिक्स मारले. शुभमन सीरीजमधील पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याच्याजागी पृथ्वीला संधी मिळेल अशी चर्चा होती. पण तिसऱ्या सामन्यात हार्दिकने शुभमन गिलवरच विश्वास ठेवला. त्याने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला.