घटस्फोट जाहीर करण्याआधीच मुलाल घेऊन देश सोडून निघून गेली हार्दिक पांड्याची पत्नी

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचा घटस्फोट झाला आहे. हार्दिकने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. दोघांचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

घटस्फोट जाहीर करण्याआधीच मुलाल घेऊन देश सोडून निघून गेली हार्दिक पांड्याची पत्नी
hardik natasha divorce
| Updated on: Jul 18, 2024 | 10:41 PM

Hardik Natasha  Divorce : भारतीय संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. दोघांनी आज ही गोष्ट जाहीर केली आहे. इस्टापोस्ट शेअर करुन त्यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांचा घटस्फोट होणार असल्याची माहिती समोर आली होती. दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांसोबत दिसले नव्हते. आयपीएलमध्ये ही नताशा दिसली नव्हती. त्यानंतर तीने इन्स्टाग्रामवरुन पांड्याचे आडनाव देखील हटवले होते. तिने मुलासोबत फोटो सोडून इतर सर्व हार्दिकचे फोटो डिलीट केले होते. याआधी हार्दिकने सहानुभूती मिळवण्यासाठी घटस्फोटाच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात होतं. पण ते खोटं निघालं. दोघांचा घटस्फोट झाल्याचं दोघांनी ही मान्य केलं आहे.

ही वेळ खूप कठीण असल्याचं दोघांनी म्हटले आहे.

सर्बियन नृत्यांगना आणि अभिनेत्री नताशा आणि हार्दिक पांड्या यांचा 31 मे 2020 रोजी विवाह झाला होता.  फेब्रुवारी 2023 मध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार पुन्हा लग्न केले. मे महिन्यात हार्दिक आणि नताशाच्या विभक्त झाल्याच्या शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या.

नताशा घटस्फोटाची माहिती जाहीर करण्याआधीच देश सोडून निघून गेली आहे. नताशा स्टॅनकोविकने भारत सोडला आहे. ती  सध्या सर्बियामध्ये आहे. बुधवारी ती तिचा मुलगा आगसत्यासोबत विमानतळावर दिसली होती.

हार्दिक पांड्या नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात दिसला होता. लग्नाच नाचताना त्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हार्दिक पांड्याने 2020 च्या सुरुवातीला नताशाला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्याच वर्षी जुलैमध्ये ते एका मुलाचे पालक झाले.

नताशा कोणत्याही आयपीएल सामन्यात दिसली नाही किंवा तिने इन्स्टाग्रामवर हार्दिक पांड्यासाठी कोणतीही पोस्ट केली नाही. विश्वचषकादरम्यानही नताशा हार्दिकसोबत दिसली नव्हती. या दोघांनी फेब्रुवारीमध्ये सोशल मीडियावर एकमेकांसोबतचा शेवटचा फोटो शेअर केला होता. नताशाच्या अनुपस्थितीनंतरच त्यांच्या विभक्त होण्याची बातमी आली.