रशियाची ही वस्तू आज प्रत्येक भारतीय घरात वापरली जाते, दिवसाची सुरुवातच त्याने होते, पण 99 टक्के लोकांना नाही माहीत
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर होते, त्यांच्या या दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली, मात्र तुम्हाला माहिती आहे का? रशियाची अशी एक वस्तू आहे, जी आज प्रत्येक भारतीय घरामध्ये वापरली जाते.

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी नुकताच भारताचा दौरा केला, हा दौरा अनेक अर्थानं महत्त्वाचा होता, त्यामुळेच अमेरिकेसह संपूर्ण जगाचं लक्ष पुतिन यांच्या या भारत दौऱ्याकडे लागलं होतं. पुतिन यांच्या या दौऱ्यामध्ये भारत आणि रशियात अनेक महत्त्वाचे करार झाले, या काराराचा आगामी काळात दोन्ही देशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. भारत आणि रशियामध्ये जे करार झाले त्याची सर्वत्र चर्चा झाली. माध्यमांमधून देखील त्याबद्दल माहिती देण्यात आली. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का? की रशियाचं असं एक प्रोडक्ट आहे, ज्याचा उपयोग भारतामधील जवळपास सर्वच घरांमध्ये केला जातो. मात्र त्याबद्दल कोणालाच फारशी काही माहिती नसते. चला तर मग जाणून घेऊयात, रशियाचं असं नेमकं कोणतं प्रोडक्ट आहे, ज्याचा वापर हा आज प्रत्येक भारतीय घरांमध्ये केला जातो.
जेव्हा पश्चिमेकडील देशांनी रशियावर प्रतिबंध घातले तेव्हा, अचानक रशियामधून होणारी कच्च्या तेलाची निर्यात मोठ्या प्रमाणात ठप्प झाली. मात्र अमेरिकेचा टॅरिफ दबाव असताना देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवी आहे. रशियानं भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीवर मोठी सूट दिली आहे, त्यामुळे सध्या स्थितीत भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कच्चे तेल हे रशियामधूनच आयात होत आहे. आशिया खंडातील दोन सर्वात मोठे देश भारत आणि चीन हे सध्या रशियामधून येणाऱ्या कच्च्या तेलावरच अवलंबून आहेत. त्यामुळे इंधनावर चालणाऱ्या भारतामधील प्रत्येक गोष्टीचं आज कोणत्यानं कोणत्या प्रकारे हे रशियासोबत कनेक्शन आढळून येत.
संपूर्ण भारतात अन्न शिजवण्यासाठी ज्या एलपीजी सिलिंडरचा वापर होतो, त्यातील गॅस हा कच्च्या तेलापासून मिळणाऱ्या लिक्विफायड पेट्रोलियम पासूनच तयार करण्यात येतो. आज प्रत्येक भारतीय कुटुंबामध्ये एलपीजी सिलिंडरचा वापर होतो. सकाळी याच गॅसवर चहा बनवण्यापासून आपल्या दिवसाची सुरुवात होते. आज आपण मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलासाठी रशियावर अवलंबून आहोत. 70 ते 75 टक्के कच्चे तेल भारत सध्या स्थितीमध्ये रशियाकडून आयात करतो, आणि यातूनच पुढे एलपीजी गॅसची निर्मिती होते. एवढंच नाही तर पेट्रोल, डिझेल देखील कच्च्या तेलापासूनच बनवलं जातं. तसेच आपण घराघरात जे प्लॅस्टिक वापरतो ते प्लॅस्टिक देखील कच्चा तेलावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या पेट्रोकेमिकल मटेरियलपासून तयार होते.
