पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर ट्रम्प यांची चाल,रशियासाठी केले हे आश्चर्यकारक काम…
युक्रेनवर रशियाचा मिसाईलचा मारा सुरुच आहे. युद्धाला दोन वर्षे झाली आहेत. परंतू अमेरिकेतून आलेल्या एका बातमीने रशियाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चक्क व्लादिमिर पुतिन यांना खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेची नवी नॅशनल सिक्युरिटी स्ट्रेटजी जारी केली आहे.यात धक्कादायक म्हणजे रशियाला आता अमेरिकेसाठी प्रत्यक्ष खतरा (Direct Threat) मानलेले नाही. हा निर्णय म्हणजे ओबामा आणि बायडन सरकारच्या धोरणाच्या १८० डिग्री यु-टर्न मानला जात आहे. दुसरीकडे क्रेमलिन म्हणजे रशियन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने यास लागलीच दुजोरा देत ट्रम्प यांची जगाला पाहाण्याची नजर आणि पुतिन यांच्या नजरेशी मिळती जुळती असल्याचे म्हटले आहे.
२०१४ मध्ये क्रीमियावर कब्जा आणि २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ल्यानंतर अमेरिकेने रशियाला नेहमीच एक आक्रमक आणि जागतिक व्यवस्थेला बिघडवणारा देश म्हटले आहे. परंतू ट्रम्प यांचे नवे धोरण फ्लेक्सिबल रियलिज्मच्या सिद्धांतावर आधारित आहे. यात स्पष्ट म्हटले आहे वॉशिंग्टन आता मॉस्को सोबत दुश्मनी वाढवण्याऐवजी स्ट्रेटजिट स्टेबिलीटी बहाल करु इच्छीत आहे.
क्रेमलिन भारावले
रशियासाठी याहून आनंदाची बाब या धोरणात लपलेली नाटोची निती आहे. ट्रम्प यांच्या रणनीतीत नाटोला नेहमीच सतत विस्तारणारी युतीच्या रुपात पाहण्याच्या धारणेला संपवण्याचे आश्वासन दिले आहे.क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी सरकारी टीव्हीवर सांगितले की यातील अनेक बदल आमच्या समज आणि विचारधारेच्या बिलकुल अनुकूल आहेत. नाटोच्या विस्ताराला रोखण्याची बाब एक खूपच सकारात्मक संकेत आहे. पेसकोव्ह यांनी सांगितले की अमेरिका रशियाला थेट धोका न मानून सहकाऱ्याची गोष्ट करण्याने दोन्ही देशांच्या नात्यात बर्फ विरघळण्यासारखे आहे.
यूरोपसाठी धोक्याची घंटी
एकीकडे मॉस्को खूश झाला असला तरी युरोपात मातमसारखा माहोल आहे. ट्रम्प यांच्या धोरणात सावध केले आहे की युरोप संस्कृतीला मिठवण्याचा धोका आहे. रशियाचा अनेक काळापासून मानत आहे की युरोपचा प्रभाव आता संपला आहे. पेसकोव्ह यांनी म्हटले की युरोपच्या प्रभावाच्या कमी संदर्भात अमेरिकेचे आकलन मॉस्कोच्या दृष्टीकोणाला दर्शवतो.युरोपच्या मोठ्या देशांना आता भीती सतावत आहे की ट्रम्प यांनी युरोपच्या सुरक्षेवरुन हात मागे घेतला आहे आणि त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडले आहे.
दिमित्री पेसकोव्ह यांनी ट्रम्प यांचे इरादे चांगले असले तरी अमेरिकेचे डीप स्टेट म्हणजे तेथील नोकरशाही आणि जुनी व्यवस्था त्यांच्या मार्गात अडथळे आणू शकते. अमेरिकेच्या डीप स्टेटचा विचार ट्रम्प याच्या विचाराहून वेगळा आहे. ट्रम्प देखील नेहमी अमेरिकन प्रशासनातील अधिकारी निवडून आलेल्या सरकारला नीट काम करु देत नाहीत असे बोलतात. आता रशियाने देखील ट्रम्प यांच्या सुरात सुर मिळवला आहे.
हा पुतिन यांचा विजय ?
ट्रम्प यांच्या टीकाकार याला पुतिन यांच्यासमोर ट्रम्प यांचे लोटांगण म्हणत आहे. ज्या देशाने शेजारी युक्रेन सारख्या देशाला नष्ट केले. त्याला खतरा न मानने धोकादायक आहे. परंतू ट्रम्प यांच्या तर्कानुसार युक्रेन युद्ध कसेही संपवणे याला प्राधान्य आहे. आता अमेरिका आणि रशियाच्या लव्ह हेट रिलेशनशिपमध्ये लव्हची तागडी भारी आहे.याचे मोठे नुकसान युक्रेन आणि युरोपला होऊ शकते.
