CSK Captaincy Change : धोनीचा निर्णय अचानक वाटतो, पण ऋतुराजला किती वर्ष आधी माहित होतं, तो कॅप्टन बनणार?

मागच्या 2 सीजमध्ये एमएस धोनीने दुसऱ्यांदा चेन्नई सुपर किंग्सची कॅप्टनशिपसोडून दुसऱ्याकडे नेतृत्व सोपवलय. मागच्या सीजनप्रमाणे यावेळी सुद्धा धोनीने धक्कातंत्राचा अवलंब केलाय. सीजन सुरु होण्याच्या एकदिवस आधी धोनीने हा निर्णय घेतला. पण याची तयारी खूप आधीपासून सुरु होती.

CSK Captaincy Change :  धोनीचा निर्णय अचानक वाटतो, पण ऋतुराजला किती वर्ष आधी माहित होतं, तो कॅप्टन बनणार?
MS dhoni-Ruturaj GaikwadImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 8:27 AM

IPL 2024 च्या सीजनची सुरुवात अशी होईल, याची कदाचितच कोणी कल्पना केली असेल. चेन्नई सुपर किंग्सची टीम सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. एमएस धोनी सीएसकेकडून टॉस उडवण्यासाठी जाईल अस अनेकांना वाटलं होतं. धोनीचा कदाचित हा शेवटचा सीजन आहे, असं बोलल जात होतं. पण त्याआधीच धोनीने धमाका केला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीने CSK ची कॅप्टनशिप सोडली. त्याने ही जबाबदारी आता टीममधील सहकारी ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवली आहे. धोनीने असा निर्णय घ्यायच कधी ठरवलं? कधी ऋतुराजला या बद्दल सांगितलं?

दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने धोनीने सीजन सुरु होण्याच्या दोन दिवस आधी अचानक चेन्नईच नेतृत्व सोडून रवींद्र जाडेजाला कॅप्टन बनवण्याचा निर्णय घेतला होता. हा धोनीचा निर्णय आहे, असं फ्रेंचायजीच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितलेलं. त्यानेच जाडेजाला कॅप्टनशिपच्या रोलसाठी निवडलं होतं. यावेळी स्थिती वेगळी नव्हती. CSK चे सीईओ काशी विश्वनाथ म्हणाले की, त्यांना सुद्धा घोषणा होण्याच्या काहीवेळ आधी हे समजलं.

धोनीने आपला निर्णय टीमला कधी सांगितला?

धोनीने कॅप्टनशिप सोडण्याच्या निर्णयाबद्दल ऋतुराजसह संपूर्ण फ्रेंचायजीला कधी सांगितलं? इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार गुरुवारी सकाळी 21 मार्चला धोनीने चेन्नईचा कोच स्टीफन फ्लेमिंग, स्क्वॉड आणि फ्रेंचाइजी मॅनेजमेंटला या बद्दल सांगितलं. धोनीने सर्वात आधी सकाळी नाश्ता करताना कोच आणि स्क्वॉडला कॅप्टनशिप बदलाच्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर फ्रेंचायजी मॅनेजमेंटला फोन करुन निर्णय कळवला, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

ऋतुराजसाठी निर्णय आश्चर्यकारक का?

ऋतुराज गायकवाडला सुद्धा अजिबात कल्पना नव्हती की, धोनी सीजन सुरु होण्याच्या सुरुवातीला कॅप्टनशिपची जबाबदारी त्याच्यावर सोपवेल. CSK चे सीईओ विश्वनाथ यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, ऋतुराजला मागच्या दोन वर्षांपासून या रोलसाठी तयार केलं जात होतं. महाराष्ट्र क्रिकेट टीमचा कॅप्टन ऋतुराजसाठी सुद्धा धोनीचा हा निर्णय आश्चर्यकारक होता.

ऋतुराजला कधी कळलं तोच कॅप्टन असणार?

रिपोर्ट्नुसार धोनीने 2022-23 मध्येच विजय हजारे ट्रॉफीच्या सीजन दरम्यान ऋतुराजला सांगितलेलं की, तूच पुढचा सीएसकेचा कॅप्टन असणार आहेस. ऋतुराज नव्या सीजनच्या तयारीसाठी टीमला चेन्नईमध्ये जॉइंन करण्यासाठी निघाला तेव्हा त्याला माहित होतं की, धोनीनंतर तोच टीमचा पुढचा कॅप्टन असेल. पण 27 वर्षाच्या ऋतुराजला हे माहित नव्हत की, 22 मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या नव्या सीजनमध्ये ही जबाबदारी मिळेल. ऋतुराज गायकवाडकडे कॅप्टनशिपचा अनुभव आहे. मागच्या 2-3 वर्षांपासून महाराष्ट्र क्रिकेट टीमसाठी प्रत्येक फॉर्मेटमध्ये त्याने नेतृत्व केलं आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....