
जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये क्रांती घडवून आणली. जिओने सुरुवातीला ग्राहकांना फुकटात अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट आणि एसएमएसची सुविधा दिली. जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये हात पाय पसरवण्यासाठी आणि प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ही योजना राबवली. फुकटात इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा मिळत असल्याने लोकांचाही जिओकडे ओढा वाढला. ठराविक आठवडे फुकटात सर्वकाही दिल्यानंतर जिओने कॉलिंग, डेटा आणि एसएमएसाठी कमी दरात निश्चित कालावधीसाठी प्लान आणला. त्यामुळे स्पर्धेत कायम राहण्यासाठी इतर स्पर्धकांनाही जिओप्रमाणे सारखाच प्लान आणावा लागला. मात्र या प्लानचा फटका ग्राहकांनाच बसला. आधी खात्यातील रक्कम संपल्यानंतर आऊटगोइंग कॉल करताच येत नव्हते. मात्र नव्या रिचार्जनुसार व्हॅलिडीटी संपेपर्यंत हवं तितकं बोलण्याची सुविधा मिळाली. मात्र या नवीन प्लाननुसार, रिचार्ज संपल्यानंतरच्या ठराविक दिवसानंतर इनकमिंग कॉल बंद केले जातात. त्यामुळे ग्राहकांना नाईलाजाने नंबर सुरु ठेवण्यासाठी ऑल ईन वन रिचार्ज करणं बंधनकारक झालंय. फिचर फोन असलेल्यांनाही नाहक ऑल ईन वन रिचार्ज (इंटरनेट, कॉलिंग आणि...