AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज किती दूध पितो? रवी शास्त्रींच्या गुगलीवर वैभव सूर्यवंशीचा षटकार, उत्तर ऐकून हसू नाही आवरणार

Vaibhav Suryavanshi on Ravi Shastri: आयपीएल 2026 च्या अमंतिम सामन्यानंतरच्या कार्यक्रमात 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी यांनी ऑरेंज कॅपसह 5 महत्त्वाच्या किताबावर नाव कोरले. त्याचवेळी रवी शास्त्री यांनी त्याला रोज किती दूध पितो असा मिश्किल सवाल केला. त्याला वैभवने पण एकदम हटके उत्तर दिले.

रोज किती दूध पितो? रवी शास्त्रींच्या गुगलीवर वैभव सूर्यवंशीचा षटकार, उत्तर ऐकून हसू नाही आवरणार
रवी शास्त्री, वैभव सूर्यवंशीImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 02, 2026 | 3:22 PM
Share

Vaibhav Suryavanshi on Ravi Shastri: IPL 2026 च्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीची टीम पोहचू शकली नाही. पण प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीवर होते. राजस्थान रॉयल्स संघाच्या या 15 वर्षांच्या दमदार खेळाडूने अनेक रेकॉर्ड स्थापन केले. त्याने 5 पुरस्कार पटकावले. वैभवने आयपीएलच्या हंगामातील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, ऑरेंज कॅप, सुपर स्ट्राईकर ऑफ द सीझन, इर्मजिंग प्लेअर ऑफ द सीझन आणि सर्वाधिक षटकारांचा किताब त्याच्या नावावर कोरला.

रवी शास्त्रींच्या गुगलीवर जबरदस्त उत्तर

वैभव सूर्यवंशी पुरस्कार घेण्यासाठी मंचावर आला तेव्हा भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांनी त्याचे कौतुक केले. शास्त्री यांनी वैभवच्या आक्रमक खेळीची स्तुती केली. यावेळी रवी शास्त्री यांनी त्याला गुगली टाकली. तू रोज किती दूध पितो? असा सवाल त्याने केले. इतक्या कमी वयात तुझ्याकडे इतकी ताकद येते कुठून असा सवाल त्याने विचारला. हा प्रश्न समोर येताच एकच हश्या पिकला. वैभव सूर्यवंशीलाही हसू आवरले नाही. त्यावर त्याने सु्द्धा हजरजबाबीपणा दाखवला. ‘मी आता दूध पित नाही’ असे वैभव म्हणताच सर्वांनाच खळखळून हसू आले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्याचे चाहते वैभवच्या या उत्तराने खूष झाले आहेत. त्यांनी त्याच्या निरागसपणाचे कौतुक केले आहे.

ऑरेंज कप जिंकून तोडला रेकॉर्ड

वैभव सूर्यवंशी केवळ 15 वर्षे आणि 65 दिवस वयाचा आहे. त्याने इतक्या कमी वयात आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. ऑरेंज कॅप जिंकणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शन याच्या नावे होता. त्याने गेल्या वर्षी 2025 मध्ये 23 वर्षे 231 दिवसाचे असताना ऑरेंज कॅप जिंकली होती. वैभवने आयपीएल 2026 च्या 16 सामन्यात एकूण 776 धावा केल्या. अंतिम सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन याच्याकडे वैभवला मागे टाकण्याची संधी होती. पण आरसीबीविरोधातील अखेरच्या सामन्यात त्यांना सूर गवसलाच नाही. त्यामुळे वैभवचा रेकॉर्ड कायम राहिला.

तर या हंगामात वैभव सूर्यवंशी याने गगनचुंबी षटकार ठोकले. त्याने या हंगामात दिग्गज खेळाडूंना घामाटा फोडला. त्यात त्याचे एकूण 72 षटकारांचा समावेश आहे. त्याने क्रिस गेलचा 14 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक रेकॉर्डही इतिहास जमा केला. क्रिस गेलने वर्ष 2012 च्या आयपीएल सामन्यात 59 षटकार ठोकले होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...