AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीची बॅट किती किलोची? या खेळाडूची बॅट सर्वात वजनदार

Vaibhav Suryavanshi Bat Weight: भारतीय तडफदार फलंदाज वैभव सूर्यवंशीने आयपीएल खऱ्या अर्थाने गाजवले. त्याने चांगल्या चांगल्या गोलंदाजांना फोडून काढले. या टुर्नामेंटमध्ये अनेक विक्रम नावावर कोरले. षटकार ठोकण्यात त्याने विश्व रेकॉर्ड केला आहे.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीची बॅट किती किलोची? या खेळाडूची बॅट सर्वात वजनदार
वैभव सूर्यवंशी याच्या बॅटचे वजन किती किलोImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 31, 2026 | 4:13 PM
Share

Vaibhav Suryavanshi Bat Weight: भारतीय दमदार फलंदाज वैभव सूर्यवंशीने यंदाचं आयपीएल गाजवलं. अवघ्या 15 वर्षांच्या या खेळाडूमुळे प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी आयपीएल डोक्यावर घेतलं. त्याच्या उत्तुंग आणि गगनचुंबी षटकारांनी अनेकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. त्याच्या नावावर आयपीएलच्या हंगामात सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम नोंदवला गेला. त्याने या सर्व सीझनमध्ये एकूण 19 षटकार ठोकले.  वैभव सूर्यवंशीच्या बॅटची जोरदार चर्चा रंगली. त्याची बॅट कोणती, ती कुठं तयार होते. तर तिचं वजन किती याविषयीचे अनेक प्रश्न गुगल करण्यात आले. किती आहे वैभवच्या बॅटचे वजन?

वैभव सूर्यवंशीच्या बॅटचे वजन किती?

वैभव सूर्यवंशी सध्या 1.15 ते 1.18 किलो वजनी बॅट वापरतो. त्याचा कोच मनीष झा यांनी याविषयीची माहिती दिली, त्यानुसार वैभव सुरुवातीला 1100 ग्रॅमची हलकी बॅट वापरायचा आहे. पण जशीजशी त्याची फलंदाजी बहरत गेली. त्याचे उत्तुंग शॉट चर्चेत आले. तसे त्याने इतर बॅटचा वापर सुरू केला. त्यावर त्याने शतकी, अर्धशतकी खेळी खेळली.

वैभव वजनदार बॅट का वापरतो?

अवघ्या 15 वर्षांचा असताना वैभव, त्याच्या वयाच्या इतर अनेक फलंदाजापेक्षा वजनदार बॅटचा वापर करतो. वजनदार बॅटमुळे उत्तुंग षटकार, चौकार मारण्यासाठी आपसूकच बळ मिळते असे मानल्या जाते. तर दमदार बॅटमुळे एक वेगळाच आत्मविश्वास धावपट्टीवर येत असल्याचे अनेक खेळाडूंचे म्हणणे आहे. मैदान गाजवण्यासाठी अनेक जण अशा बॅटचा सहज वापर करतात.

क्रिकेटच्या इतिहासात वजनदार बॅट कुणाची?

क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वजनदार बॅटचा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराऊंडर लान्स क्लूसनर याचे नावे आहे. या खेळाडूच्या बॅटचे वजन 1.53 किलो होते. या दमदार खेळाडूने 1990 च्या दशकातील काही वर्षे आणि 2000 च्या सुरुवातीला मैदान गाजवले होते. त्याच्या स्फोटक खेळीने तो गोलंदाजांवर प्रभाव टाकत असे. त्याच्या हिटिंग स्टाईलमुळे गोलंदाज अगोदरच भांबावत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना सुद्धा वजनदार बॅटची आवड होती. काहींच्या मते त्यांच्या बॅटचे वजन हे 1.47 किलो ते 1.51 किलो दरम्यान होते. विशेष म्हणजे टेनिस एल्बोचा त्रास झाला. त्यानंतर त्यावरील उपचार झाले. तरीही सचिनने हलकी बॅट वापरली नाही. त्याने जुन्याच बॅटचा वापर केला. वेस्ट इंडिजचा धमाकेदार फलंदाज क्रिस गेल याच्या बॅटचे वजनही 1.36 किलो तर सलामीवीर वीरेंद्र सहवाग याच्या बॅटचे वजन 1.35 किलो इतके होते.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन.

ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप.

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग.

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार.

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी.

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी

मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा.

मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा