AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्याला क्रिकेट शिवाय…’, वैभव सूर्यवंशी याला कपिल देव यांचा मोठा इशारा.. म्हणाले भविष्यात…

Vaibhav Sooryavanshi: 1983 मधील विश्वचषकाचे विजेते कर्णधार कपिल देव यांनी वैभव सूर्यवंशी याच्या भविष्याविषयी एक मोठा इशारा दिला आहे. वैभव जस जसा आयुष्याविषयी शिकायला लागेल, तस तसा त्यात बदल होत जाईल असे कपिल देव म्हणाले.

'त्याला क्रिकेट शिवाय...', वैभव सूर्यवंशी याला कपिल देव यांचा मोठा इशारा.. म्हणाले भविष्यात...
कपिल देव, वैभव सूर्यवंशी Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 30, 2026 | 4:20 PM
Share

Kapil Dev Warning on Vaibhav Sooryavanshi: राजस्थॉन रॉयल्सचे तरुण, तडफदार आणि धमाकेदार खेळाडू वैभव सूर्यवंशी आता अवघ्या 15 वर्षांचा आहे. त्याने व्हाईट बॉल फॉर्म्याटमध्ये कमाल कामगिरी करून दाखवली आहे. त्याच्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. पण अनेक दिग्गजांनी या डावखुऱ्या फलंदाजाविषयी चिंता व्यक्त केली आहे. तो रेड बॉल फॉर्म्याटमध्ये तितकीशी कमाल दाखवेल की नाही हा त्यांना प्रश्न पडला आहे. तर काहींना तो कसोटी मालिकेत कसा खेळतो याची उत्सुकता आहे. आताच कुठे वैभवच्या क्रिकेट जीवनाला सुरूवात झाली आहे. त्याला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. त्याचा खेळ पाहिल्यानंतर 1983 मध्ये देशाला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनी मोठे भाकीत केले आहे. त्यांनी या तरुण खेळाडूला भविष्यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आयुष्याच्या शाळेतील धडे

द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत कपिल देव यांनी वैभव याला वडिलकीचा सल्ला दिला आहे. जस जसा वैभव जीवनाचा अनुभव घेईल, आयुष्याच्या शाळेत धडे गिरवेल. तशा त्याच्यासाठी काही गोष्टी बदलतील. सध्या तर त्याच्या आयुष्यात क्रिकेट शिवाय काहीच नाही. खरोखरच तो एक खास खेळाडू आहे. पण आपल्याला त्याला वेळ द्यावा लागेल. तो अजून लहान आहे. त्याला क्रिकेट व्यतिरिक्त अजून दुसरं काही माहिती नाही. जेव्हा तो आयुष्याच्या शाळेत धडे गिरवेल. तेव्हा त्याच्यासाठी काही गोष्टींचे संदर्भ बदलतील. सध्या तो एकदम फॉर्ममध्ये आहे. तो स्पेशल टॅलेंट आहे, यात काही शंकाच नाही. पण त्याला अजून बराच लंबा टप्पा गाठायचा आहे असे कपिल देव यांनी सल्ला दिला.

70 षटकारांचा विश्वविक्रम

वैभव सूर्यवंशी याने गुजरात टायटन्सविरोधात शुक्रवारी महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, मुल्लांपूरमध्ये क्वालिफायर-2 सामन्यात 47 चेंडूवर 96 धावा काढल्या. वैभव सूर्यवंशीने या दरम्यान 204.26 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने या सामन्यात 8 चौकार आणि 7 षटकार चोपले. वैभव सूर्यवंशीने यासोबतच IPL 2026 हंगामात एकूण 72 षटकार ठोकण्याचा अविश्वसनीय रेकॉर्ड नावावर कोरला. इतक्या कमी वयात अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. वैभव सूर्यवंशीने टी20 टूर्नामेंटच्या एका हंगामात 70 वा त्यापेक्षा अधिक षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम केल्यानंतर अनेक खेळाडूंनी त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली. यापूर्वी जगातील कोणत्याच खेळाडूला असा विक्रम नावावर करता आलेला नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...