AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : गोळीबार टायगर श्रॉफवर, पण सलमान खानच्या सुरक्षेत वाढ कारण…, मुंबई पोलिसांसह कमांडो, घराला बुलेटप्रूफ काच, सबमशीन गन अन्…

Salman Khan : अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबारानंतर बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण आहे. टायगर याच्यावर झालेल्या गोळीबारानंतर अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

Salman Khan : गोळीबार टायगर श्रॉफवर, पण सलमान खानच्या सुरक्षेत वाढ कारण..., मुंबई पोलिसांसह कमांडो, घराला बुलेटप्रूफ काच, सबमशीन गन अन्...
सलमान खान - टायगर श्रॉफ
| Updated on: Oct 21, 2026 | 9:11 AM
Share

Salman Khan : अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबारानंतर अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. भाईजानच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिका शस्त्रांसह जवान तैनात करण्यात आले आहे. सांगायचं झालं तर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ नव्ह तर बडे स्टार आधी आरोपींच्या निशाण्यावर होते. टायगर याच्यापूर्वी महानायक अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार आरोपींच्या निशाण्यावर होते. पण त्यांच सुरक्षा अधिक असल्यामुळे आरोपींना त्यांचा प्लॅन बदलला आणि टायगर याच्यावर गोळीबार केला, असं सांगण्यात येत आहे. अशात गंभीर परिस्थीती पाहता सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. कारण याापूर्वी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर हल्लेखोरांनी गोळीबार केलेला.

आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, सलमान खान यांच्या घराची आरोपींकडून रेकी केली, ज्यामुळे सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटला बुलेटप्रूफ काचांचे संरक्षण देण्यात आलं आहे. अभिनेत्याच्या घराच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमान खान यांच्या घराला बुलेटप्रूफ काचांचं सुरक्षा कवच देण्यात आलं आहे, तर सीसीटीव्हीत देखील वाढ करण्यात आली आहे

टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सलमानच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे. मुंबई पोलिसांसह कमांडोंची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सलमानच्या सुरक्षेत आता अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज जवानांचा समावेश करण्यात आला आहे. सुरक्षारक्षकांकडे MP5 SD6 सबमशीन गन, MP5 SD6 हे Heckler & Koch कंपनीचं प्रसिद्ध सबमशीन गन, 9×19 mm पॅराबेलम कॅलिबरच्या गोळ्यांसाठी डिझाइन, इंटिग्रेटेड सप्रेसरमुळे फायरिंगचा आवाज आणि फ्लॅश कमी करण्यासाठी विशेष रचना, 15 आणि 30 राउंडच्या मॅगझिनचा पर्याय देखील उपलब्ध करण्यात आला आहे .

सांगायचं झालं तर, MP5 SD मालिकेचा वापर जगभरातील काही विशेष सुरक्षा आणि लष्करी दलांकडून केला जातो. उच्च फायरिंग क्षमता, कॉम्पॅक्ट डिझाइन आणि सप्रेसरमुळे हे अत्यंत गंभीर सुरक्षा परिस्थितीसाठी वापरलं जाणारं शस्त्र आहे. सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटींवर प्राणघातक हल्ले झाले आहेत. हल्लेखोरांकडून होणारे हल्ले आणि सतत येणाऱ्या धमक्यांमुळे बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!