
नवी दिल्ली : वनडे वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी क्रिकेट टीम भारतात दाखल झाली आहे. सध्या त्यांचा मुक्काम हैदराबादमध्ये आहे. हैदराबादमधील वास्तव्यात पाकिस्तानी टीमला कुठलीही अडचण येऊ नये, त्यांना सहजता वाटावी, यासाठी पोलीस विशेष काळजी घेत आहेत. पाकिस्तानी टीमच्या सुरक्षेसाठी हैदराबाद पोलीस पूर्णपणे सर्तक आहेत. पाकिस्तानी टीमच्या सुरक्षेसाठी हैदराबाद पोलीस ओव्हरटाइम काम करतायत. येत्या 29 सप्टेंबरला म्हणजे आज पाकिस्तानी टीम भारतात आपला पहिला सराव सामना खेळणार आहे. सात वर्षाच्या अंतरानंतर पाकिस्तान क्रिकेट टीम भारतात आली आहे. याआधी 2016 वनडे वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची क्रिकेट टीम भारतात आली होती. बुधवारी पाकिस्तानी टीम भारतात दाखल झाली. त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सध्या हैदराबादमधील मध्यवर्ती भागातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पाकिस्तानी टीम उतरली आहे. तिथे कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे.
काल अनंत चतुर्दशी होती. गणेश विसर्जनाचा सोहळा शहरात पार पडला. त्यामुळे हैदराबाद पोलिसांवर दुहेरी ताण पडला. पण हैदराबाद पोलिसांनी आपली जबाबदारी चोख बजावली. पाकिस्तान क्रिकेट टीम हैदराबादमध्ये दोन आठवडे मुक्काम करणार आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमचा पहिला सराव सामना आज आहे. 2019 वनडे वर्ल्ड कपचे उपविजेते न्यूझीलंड विरुद्ध शुक्रवारी हैदराबादमध्ये हा सामना होईल. प्रेक्षकांशिवाय हा सामना पार पडणार आहे. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी टीमचा पुढचा सराव सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होईल. 3 ऑक्टोबरला हा सामना होईल. या सामन्याला प्रेक्षक उपस्थित असतील. त्यासाठी 800 पोलिसांची गरज भासणार आहे.
पाकिस्तान टीमचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना कुठल्या टीम विरुद्ध?
स्टेडियम आणि हॉटेलमध्ये जी सुरक्षा व्यवस्था आहे, त्यावर पाकिस्तान क्रिकेट टीम समाधानी आहे. बऱ्याच काळानंतर पाकिस्तान क्रिकेट टीम भारतात आली आहे. त्याचा मुक्काम सुरक्षित आणि शांततामय रहावा, यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. बाबर आजम 2016 साली टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतात आला नव्हता. भारतात खेळण्यासाठी आपण खूप उत्सुक्त आहोत, असं बाबरने म्हटलय. व्यक्तीगत कामगिरीपेक्षा टीमची कामगिरी महत्त्वाची ठरेल असं बाबरने म्हटलय. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये क्षमतेनुसार खेळण्याचा प्रयत्न करीन, असं बाबरने म्हटलय. 6 ऑक्टोबरला हैदराबाद येथे नेदरलँड विरुद्धच्या सामन्याने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात होईल.