ODI World cup 2023 | पाकिस्तानी टीमला भारतात प्रेम, मान-सन्मान, पण अखेर PCB च्या अध्यक्षाने ओकली गरळ
World cup 2023 | पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख भारताबद्दल काय म्हणाले? पाकिस्तानी सत्ताधीश नाही सुधरणार. भारतात पाकिस्तानी खेळाडूंना प्रेम मिळतय. पाकिस्तानी टीमच्या स्मरणात एका चांगली आठवण रहावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

हैदराबाद : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. पाकिस्तानी टीम वर्ल्ड कपसाठी बुधवारी भारतात दाखल झाली. पाकिस्तानी टीम हैदराबादमध्ये पोहोचली आहे. तिथे पाकिस्तानी टीम आपले सराव सामने खेळणार आहे. पाकिस्तानचा पहिला सामना सुद्धा हैदराबादमध्येच आहे. हैदराबादमध्ये टीमच जोरदार स्वागत करण्यात आलं. पाकिस्तानी टीम ज्या हॉटेलमध्ये उतरलीय, तिथे त्यांचं आदिरातिथ्य करण्यात आलं. पाकिस्तानी खेळाडू सुद्धा या आदिरातिथ्याने आनंदी दिसले. भारतात मिळणाऱ्या प्रेमाच त्यांनी सोशल मीडियावर कौतुक केलं. पण पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे प्रमुख जका अशरफ यांची भारताबद्दल तशी भावना नाहीय. त्यांनी भारत आपला शत्रू देश असल्याच म्हटलं आहे.
भारतात पाकिस्तानी खेळाडूंना प्रेम मिळतय. पाकिस्तानी टीमच्या स्मरणात एका चांगली आठवण रहावी, यासाठी भारतीय प्रयत्न करत असताना जका अशरफ यांनी हे वक्तव्य केलय. पाकिस्तानी टीम सात वर्षानंतर भारतात आलीय. याआधी 2016 साली पाकिस्तानी टीम भारतात आली होती. त्यावेळी भारताकडे टी 20 वर्ल्ड कपच यजमानपद होतं. त्या संघातील एकही प्लेयर सध्याच्या टीममध्ये नाहीय. सध्याच्या पाकिस्तानी टीममधील प्लेयर पहिल्यांदा भारतात आलेत. या टीममधील एकही खेळाडूकडे भारतात खेळण्याचा अनुभव नाहीय.
Somebody please check what is he smoking these days ?! 🤦🏻♂️ sheer non sense statement.#ZakaAshraf #CricketTwitter
— FC (@fad08) September 28, 2023
जका अशरफ यांनी काय म्हटलय?
जका अशरफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाकिस्तानी खेळाडूंच्या सेंट्रल कॉ़न्ट्रॅक्टच्या रक्कमेमध्ये वाढ झालीय, त्यावरुन जका अशरफ स्वत:ची पाठ थोपटून घेतायत. भारत शत्रू देश असल्याच ते व्हिडिओमध्ये बोलताना दिसतायत. “पाकिस्तानच्या इतिहासात क्रिकेटर्सना इतके पैसे कधी मिळाले नाहीत. खेळाडूंचा आत्मविश्वास नेहमीच उंचावलेला रहावा” हाच या मागे उद्देश आहे असं जका अशरफ म्हणाले. “पैसे जास्त मिळाल्याने खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलेला राहील. ते शत्रूच्या देशात किंवा अन्य कुठल्या देशात गेल्यास तिथे चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतील” असं जका अशरफ यांना वाटतं. राजकीय पातळीवर भारत-पाकिस्तानमध्ये चांगले संबंध नाहीयत. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो. त्याशिवाय भारतावर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानच आहे. त्यामुळेच दोन्ही देशात अनेक वर्षांपासून क्रिकेट मालिका झालेली नाही. नुकतीच आशिया कप स्पर्धा झाली. त्यावेळी भारताने पाकिस्तानचा दौरा केला नाही.
