NZ vs IND : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने, विजयी हॅटट्रिक कोण करणार?

New Zealand vs India Champions Trophy 2025 Live Streaming : रविवारी 2 मार्चला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ अजिंक्य आहेत. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

NZ vs IND : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने, विजयी हॅटट्रिक कोण करणार?
Image Credit source: blackaps and kuldeep Yadav icc x account
| Updated on: Mar 01, 2025 | 7:58 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना हा रविवारी 2 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील तिसरा सामना असणार आहे. ए ग्रुपमधील दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहचले आहेत. दोन्ही संघांनी बांगलादेश आणि पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.त्यामुळे दोन्ही संघांकडे रविवारी विजयी हॅटट्रिक करण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र दोघांपैकी कुणा एका संघाचाच विजय होईल. त्यामुळे टीम इंडिया न्यूझीलंडचा विजयी रथ रोखत हॅटट्रिक पूर्ण करणार? की किवी सलग तिसरा विजय मिळवणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया सामना केव्हा?

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामना रविवारी 2 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया सामना कुठे?

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार. तर 2 वाजता टॉस होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर सामन्याच लाईव्ह थरार जिओ-हॉटस्टार एपवर पाहता येईल.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.