SAW vs INDW Toss : टीम इंडियाने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 बदल, श्रेयांकाच्या जागी कुणाला संधी?

South Africa Women vs India Women Toss and Playing 11 : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. नक्की कुणाला संधी मिळालीय? हे जाणून घेऊयात.

SAW vs INDW Toss : टीम इंडियाने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 बदल, श्रेयांकाच्या जागी कुणाला संधी?
SAW vs INDW Toss and Playing 11
Image Credit source: bcci women X Account
| Updated on: Jun 21, 2026 | 7:52 PM

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज 21 जून रोजी 18 व्या सामन्यात टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे.दोन्ही संघ ए ग्रुपमधील आहेत. तसेच टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचा हा तिसरा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे मँचेस्टरमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघांकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत.

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेवर वरचढ

टी 20I क्रिकेटमध्ये टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 21 टी 20I सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 21 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर 11 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्ध 10 सामने जिंकले आहेत. तसेच दोन्ही संघांची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ एकमेकांविरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 व्या पर्वात पहिला विजय मिळवणार? याची उत्सूकता चाहत्यांना आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या  दोन्ही बाजूने प्लेइंग ईेलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी 2 बदलांसह मैदानात उतरली आहे. श्रेयांका पाटील हीला नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे श्रेयांकाच्या जागी प्रेमा रावत हीचा समावेश करण्यात आला. आता प्रेमा रावत हीला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. प्रेमाचं यासह टी 20i पदार्पण झालं आहे. तर क्रांती गौड हीला विश्रांती देण्यात आली आहे. क्रांतीच्या जागी अरुंधती रेड्डी हीचा समावेश करण्यात आला आहे.

प्रेमा रावतचं टी 20i पदार्पण

दक्षिण आफ्रिका वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वोल्वार्ड्ट (कॅप्टन), ताझमिन ब्रिट्स, ॲनेरी डेर्कसेन, डेन व्हॅन निकेर्क, मारिझान कॅप, नादिन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन (विकेटकीपर), सिनालो जाफ्ता, शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका आणि नॉनकुलुलेको मलाबा.

वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, श्री चरणी आणि नंदनी शर्मा.

Follow Us