जर 7 अटी पूर्ण झाल्या नाहीत तर… जगात हाहाकार, इराणची सर्वात मोठी धमकी..
इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम जगावर बघायला मिळाला. भारतालाही या युद्धाचा फटका बसला. त्यातच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. इराणने अमेरिकेला युद्धविरामचा प्रस्ताव दिला. सात अटी या प्रस्तावात ठेवण्यात आल्यात.

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढत आहे. मात्र, अमेरिकेतील निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला मोठे अपयश मिळाले. त्यातच आता युद्ध थांबण्याच्या दिशेने पाऊल उचलले जात आहे. इराणकडून कतारला एक प्रस्ताव पाठवण्यात आला. अमेरिकेला हा प्रस्ताव त्यांनी पाठवला. परमाणु प्रस्ताव त्यांनी पाठवला आहे. मीडियासोबत बोलताना इराणचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, या प्रस्तावावर चर्चा त्याचवेळी होणार, ज्यावेळी अमेरिका आमच्या सातही अटी मान्य करणार. इराणच्या अधिकाऱ्यांने ओळख लपवून ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही दिलेल्या प्रस्तावाचा अभ्यास अमेरिकेकडून केला जात आहे. इराणचे वरिष्ठ अधिकारी मोहसिन रजाई यांनी बोलताना म्हटले की, रशिया दाैऱ्यावर असतानाच अमेरिकेच्या पुढे सात अटी ठेवल्या होत्या.
जोपर्यंत अमेरिका या अटी मान्य करणार नाही, तोपर्यंत होर्मुज खाडी खुली करणे शक्य नाही. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. त्यात इराणवर घातलेले निर्बंध काढणे, परदेशातील इराणी मालमत्तेची पुनर्प्राप्ती, इराणच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करणे, हेच नाही तर इराणच्या आसपास असलेली अमेरिकेच्या सैनिकांची नाकेबंदी काढणे आणि अमेरिकी सैन्याला परत बोलावले अशा काही अटी इराणकडून ठेवण्यात आल्यात.
या सर्व मागण्या इराणने अमेरिकेपुढे ठेवल्या आहेत. पण अमेरिकेने इराणच्या या मागण्या आतापर्यंत मान्य केल्या नाहीत. इराणने हा प्रस्ताव कतारकडे पाठवला. या सात अटी मान्य झाल्याशिवाय चर्चा किंवा कोणतीही बैठक होणार नसल्याचे इराणने स्पष्ट केले. अमेरिकेकडून या प्रस्तावावर अभ्यास सुरू आहे.
आता डोनाल्ड ट्रम्प नक्की काय निर्णय घेतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या युद्धामुळे डोनाल्ड ट्रम्प यांन दणका बसताना दिसत आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प काहीतरी वेगळा निर्णय घेऊ शकतात. इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम जगावर होताना दिसत आहे. भारतातही महागाई वाढताना दिसली. कच्च्या तेलाच्या किंमती तूफान वाढल्या. ज्यामुळे भारताला कच्च्या तेलासाठी अधिकचे पैसे मोजावी लागली.
