AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला उडवण्याची धमकी, सर्वत्र खळबळ

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील जलसा बंगल्याला उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे पोलीस कंट्रोल रूममध्ये धमकी दिल्याची माहिती मिळत आहे.

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगला उडवण्याची धमकी, सर्वत्र खळबळ
अभिनेते अमिताभ बच्चन
| Updated on: Nov 06, 2026 | 12:52 PM
Share

बॉलिवूडमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील जलसा बंगल्याला उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे पोलीस कंट्रोल रूममध्ये धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. धमकीनंतर पोलिसांनी जलसा बंगल्याची तपासणी केली असता, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. धमकी कोणी आणि कुठून दिली, याचा तपास पोलीस करत आहेत. सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही जेव्हा अमिताभ बच्चन  यांचा बंगला उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी देखील बिग बींचा बंगला उडवण्याची धमकी आली आहे.

यापूर्वी अभिनेते अमिताभ बच्चन यांना जलसा या बंगल्याला बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका ईमेलद्वारे मिळाली आहे. याव्यतिरिक्त, प्रसिद्ध गायक दलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टलाही ग्रेनेडने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली. सतत येत असलेल्या धमक्यांमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेत देखील मोठया प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

सांगायचं झालं तर, अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ही घटना घडली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार,  महापौर कार्यालयाबरोबरच अनेक शाळांनाही धमकी देण्यात आलेली. बिग बी अमिताभ बच्चन आणि दिलजित दोसांज यांच्या कंसर्टलाही उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

सतत येणाऱ्या धमक्यांनंतर  अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय…

सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन प्रत्येक रविवारी जलसाच्या बाहेर फॅन्सना भेटण्यासाठी आपल्या ट्रॉलीवर येतात. तिथून ते आपल्या चाहत्यांना समोरून भेटतात, हॅलो म्हणतात आणि त्यांचा दिवस आनंदी बनवतात. फॅन्सही त्यांना भेटण्यासाठी तासन्तास उभे राहतात. अशा परिस्थितीत धमकी मिळाल्यानंतरही त्यांनी ही परंपरा थांबवली नाही. ते कडक सुरक्षेत फॅन्सना भेटण्यासाठी जलसाच्या बाहेर येतात.

धमक्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच जेव्हा बिग बी फॅन्सना भेटण्यासाठी जलसाचे दार उघडतात, तेव्हा अभिषेक वडिलांच्या सोबत सावलीसारखा उभा असल्याचे दिसत आहे. या रविवारी त्यांच्या सुरक्षेत आणखी एक भर टाकण्यात आली आहे. त्यांच्या ट्रॉलीला बुलेटप्रूफ काचेने झाकण्यात आले आहे. त्यांचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात ते या बुलेटप्रूफ काचेच्या मागे दिसले आणि फॅन्सना पुन्हा एकदा निराश होऊ दिले नाही.

Follow Us
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट..
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट कारवाई
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास बंदी; मोठं कारण समोर?
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन!