U19 World Cup: भारताचे 6 खेळाडू कोरोनाबाधित, प्लेइंग XI वर टांगती तलवार, खेळाडू कमी पडले तर उपाय काय?

| Updated on: Jan 21, 2022 | 10:49 AM

अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत (U19 Cricket World Cup) भारताची (India U19) घोडदौड सुरु झाली आहे. मात्र या वाटेत कोरोना विषाणू (Covid-19) आडवा आला असल्याचे पाहायला मिळत आहे.

U19 World Cup: भारताचे 6 खेळाडू कोरोनाबाधित, प्लेइंग XI वर टांगती तलवार, खेळाडू कमी पडले तर उपाय काय?
India U-19 (Photo: FILE)
Follow us on

मुंबई : अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत (U19 Cricket World Cup) भारताची (India U19) घोडदौड सुरु झाली आहे. मात्र या वाटेत कोरोना विषाणू (Covid-19) आडवा आला असल्याचे पाहायला मिळत आहे. भारत 17 खेळाडूंच्या संघासह या स्पर्धेत पोहोचला आहे. पण, ग्रुप स्टेजमधील आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचे 6 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. म्हणजेच, केवळ प्लेइंग इलेव्हन बनवू शकतील इतकेच खेळाडू शिल्लक आहेत. आता अशा परिस्थितीत भारतातील आणखी एखादा खेळाडू कोरोनाच्या विळख्यात अडकल्यावर काय होईल हा मोठा प्रश्न आहे. खेळाडू कमी पडले तर काय करायचे? असा सवाल अनेकांना सतावतोय.

तर सर्वप्रथम जाणून घ्या, कोरोनामुळे अनुपलब्ध असलेल्या खेळाडूंबद्दल. म्हणजेच असे खेळाडू जे संघापासून वेगळे ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी पहिले नाव भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार यश धुलचे आहे. दुसरा उपकर्णधार शेख रशीद आहे. याशिवाय फलंदाज सिद्धार्थ यादव, यष्टिरक्षक आराध्या यादव, अष्टपैलू मानव प्रकाश आणि वेगवान गोलंदाज वासू वत्स यांच्या नावाचा समावेश आहे.

युगांडाविरुद्धच्या सामन्यावर काय परिणाम होईल?

या 6 खेळाडूंशिवाय भारताने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 174 धावांनी मोठा विजय नोंदवला. पण, युगांडासोबतच्या तिसऱ्या सामन्यावर याचा काय परिणाम होईल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल, तर त्याचं उत्तर म्हणजे भारत या सामन्यातदेखील त्याच प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरेल, ज्यासह ते आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरले होते. कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले 6 खेळाडू 10 दिवसांच्या क्वारंटाईननंतरच मैदानात परतू शकतील. दरम्यान, भारताने पहिले दोन सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळवले आहे. तसेच युगांडाचे आव्हानही भारतासाठी अवघड नाही. अशा स्थितीत खेळाडूंना दुखापत झाली तरच भारतासमोर समस्या निर्माण होऊ शकते, कारण त्यानंतर संघाकडे कोणताही पर्याय उरणार नाही.

भारताचे आणखी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास काय होईल?

भारताचे 11 खेळाडू फिट राहिल्यास ही स्पर्धा भारताचा जसा प्रवास सुरू आहे तशीच होईल. परंतु, खेळाडू 11 पेक्षा कमी असतील म्हणजेच प्लेइंग इलेव्हन बनवण्यासाठी खेळाडू उपलब्ध नसतील, तर स्पर्धेची तांत्रिक समिती भारताचे वेळापत्रक पुढे ढकलून ते इतर ठिकाणी पूर्ण करू शकते. स्पर्धेच्या प्लेइंग कंडीशन आणि नियमांमध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे, जे सर्व संघांसाठी आहेत. या नियमाचा फायदा असा आहे की 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या वेगाला यामुळे ब्रेक लागणार नाही.

इतर बातम्या

IND vs SA 2nd ODI LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहाल सामना

Road Safety World Series च्या आयोजकांनी सचिन तेंडुलकरचे पैसे खाल्ले, मास्टर ब्लास्टरने घेतला मोठा निर्णय

(ICC U-19 World Cup: Covid strikes India U-19 camp, six players ruled out of league)