
मुंबई | टीम इंडियाने अखेरचा वनडे वर्ल्ड कप 2011 साली श्रीलंकेला पराभूत करुन जिंकला. तेव्हापासून ते आतापर्यंत 12 वर्षात टीम इंडियाची विश्व विजेता होण्याची प्रतिक्षा कायम आहे. यंदा भारतात वर्ल्ड कप स्पर्धा होत आहे. त्यामुळे टीम इंडिया प्रबळ दावेदार समजली जात आहे. टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वात यंदा वर्ल्ड कप जिंकणारच, असा विश्वास क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र टीम इंडियासमोर वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठं आव्हान आहे. ते आव्हान नक्की काय आहे, हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडियाला आयसीसी वर्ल्ड कपमध्ये 2003 पासून आतापर्यंत एकदाही न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. टीम इंडियाने न्यूझीलंडवर 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये अखेरचा विजय मिळवला होता. तेव्हा टीम इंडियाने सौरव गांगुली याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली होती. मात्र तेव्हापासून टीम इंडियाला अजून न्यूझीलंडला चितपट करता आलेलं नाही. त्यामुळे टीम इंडियासमोर न्यूझीलंडला पराभूत करण्याचं आव्हान असणार आहे.
न्यूझीलंडने टीम इंडियाला 2003 नंतर 2019 पर्यंत एकूण 5 वेळा आयसीसी वर्ल्ड कपमध्ये पराभवाची धुळ चारली आहे. यापैकी 3 सामने हे टी 20 तर 2 सामने वनडे वर्ल्ड कपमधील आहेत. दरम्यान टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 22 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड कपमधील सामना होणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून गेल्या 20 वर्षांची प्रतिक्षा संपवण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड
Last time when India defeated New Zealand in an ICC event:
– Virat Kohli was 14 years old.
– Rohit Sharma was 16 years old.
– MS Dhoni and Gautam Gambhir yet to make their debut.
– T20 format was not invented.
– Sachin had less than 9,000 Test runs.– The year was 2003…!!! pic.twitter.com/zgMx9JNAlo
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 3, 2023
न्यूझीलंड टीम | केन विल्यमसन (कॅप्टन), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री,
टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साउथी आणि विल यंग.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.