AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली सलग तिसऱ्यांदा ‘0’ वर बाद झाला तर काय? असं होणार हे निश्चित

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जवळपास सात महिन्यांच्या कालावधीनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे मैदानात उतरले आहेत. रोहित शर्माला सूर गवसला आहे. पण विराट कोहलीचं काही खरं दिसत नाही. सलग दोन सामन्यात शून्यावर बाद झाला आहे.

विराट कोहली सलग तिसऱ्यांदा '0' वर बाद झाला तर काय? असं होणार हे निश्चित
विराट कोहली सलग तिसऱ्यांदा '0' वर बाद झाला तर काय? असं होणार हे निश्चितImage Credit source: PTI
| Updated on: Oct 24, 2025 | 3:53 PM
Share

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. सलग दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा वनडे सामना हा औपचारिक असणार आहे. या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे. तिसरा वनडे सामना सिडनीत होणार असून भारतीय संघ तिथे पोहोचला आहे. या सामन्यात क्रीडाप्रेमींचं लक्ष हे विराट कोहलीकडे असणार आहे. कारण मागच्या दोन्ही सामन्यात विराट कोहली फेल गेला आहे. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. पर्थ आणि एडिलेड वनडे सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. आता तिसऱ्या वनडे सामन्यातही विराट कोहली शून्यावर बाद झाला तर काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. जर तसं झालं तर दिग्गज क्रिकेटपटूच्या नावावर नकोसा विक्रम रचला जाईल.

सिडनी वनडे सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला तर अशी नकोशी कामगिरी करणारा सहावा भारतीय फलंदाज ठरेल. यापूर्वी सूर्यकुमार यादव, अनिल कुंबले, झहीर खान आणि इशांत शर्मा हे तीन वेळा शून्यावर बाद झाले आहेत. पण भारतीय क्रिकेट इतिहासात कोणताही खेळाडू वनडे मालिकेत सलग तीन वेळा शून्यावर बाद झालेला नाही. जर सिडनी वनडे सामन्यात असं झालं तर विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम रचला जाईल. वनडे सामन्यात सलग तीन वेळा शून्यावर बाद होणाऱ्या यादीत दिग्गज खेळाडू आहेत. यात सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंगसारख्या दिग्ग फलंदाजांचा समावेश आहे. तसेच टॉम लॅथम,लान्स क्लूजनर, सूर्यकुमार यादव आणि शोएब मलिक यांनी वनडेत झिरोची हॅटट्रीक केली आहे.

विराट कोहलीचा सिडनी नकोसा रेकॉर्ड

विराट कोहलीचं सिडनीच्या मैदानाशी 36 चा आकडा आहे. या मैदानात विराट कोहलीचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. त्यामुळे या सामन्यातही शून्यावर बाद होण्याची चिन्ही क्रीडाप्रेमींना दिसत आहेत. विराट कोहलीने 7 वनडे सामन्यात फक्त 146 धावा केल्या आहेत. या धावाही त्याने 25पेक्षा कमी सरासरीने केल्या आहेत. आता विराट कोहली फॉर्मही नाही. सात महिन्यानंतर वनडे मालिका खेळत असून पहिल्या दोन सामन्यात फेल गेला. त्यामुळे त्याच्यावर दबाव असणार यात काही शंका नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...