
क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणारा मराठमोळा ऋतुराज गायकवाड इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ऋतुराज इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. ऋतुराजने रेड बॉल क्रिकेटसाठी यॉर्कशायरसह करार केला आहे. ऋतुराज 5 काउंटी चॅम्पियन्शीप सामन्यांसाठी आणि वनडे कप स्पर्धेसाठी उपलब्ध असू शकतो. ऋतुराजने आतापर्यंत टीम इंडियाचं 6 एकदिवसीय आणि 23 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. ऋतुराजचा इंडिया ए संघात समावेश करण्यात आला होता. मात्र ऋतुराजला या दोन्ही सामन्यात संधी मिळाली नाही. इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया ए यांच्यातील 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचची सीरिज 0-0 ने बरोबरीत राहिली.
ऋतुराजने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. ऋतुराजने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 41.77 च्या सरासरीने
7 शतकं झळकावली आहेत. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये ऋतुराजने आणखी भारी कामगिरी केली आहे. ऋतुराजने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 56.15 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच 16 शतकं झळकावली आहेत.
“मी इंग्लंडमध्ये उर्वरित देशांतर्गत सामन्यांसाठी यॉर्कशायर टीमकडून खेळण्यासाठी उत्साहीत आहे. इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्याचा अनुभव मिळवणं हे माझ्य लक्ष्य राहिलं आहे. तसेच इंग्लंडमध्ये यॉर्कशायरपेक्षा दुसरा कोणता मोठा कल्ब नाही. काउंटी चॅम्पिनयशीप स्पर्धेत आमच्यासाठी काही सामने हे महत्त्वाचे आहेत. तसेच वन डे कप जिंकण्याची संधी आहे”, असं ऋतुराजने म्हटलं. ऋतुराजला आयपीएलच्या 18 व्या मोसमातून दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं होतं. त्यामुळे ऋतुराज एप्रिल महिन्यापासून एकही सामना खेळू शकला नव्हता.
ऋतुराज इंग्लंडमधील ‘या’ टीमसाठी खेळणार
Ruturaj Gaikwad about Joining Yorkshire:
“I’m excited to be joining up with Yorkshire for the rest of the English domestic season. It has always been a goal of mine to experience cricket in this country and there is no bigger Club in England than Yorkshire”. pic.twitter.com/zkOChZ4NJC
— Johns. (@CricCrazyJohns) June 10, 2025
“ऋतुराजने या हंगामातील दुसऱ्या टप्प्यासाठी आमच्यासह करार केल्याने मी आनंदी आहे. ऋतुराज कुशल क्रिकेटर आहे.
ऋतुराज नैसर्गिक क्रिकेट खेळतो. ऋतुराज परिस्थितीशी एकरुप होऊन गरेजनुसार क्रिकेट खेळतो. ऋतुराजमुळे आमच्या बॅटिंगची ताकद वाढेल. तसेच ऋतुराजमध्ये वेगाने धावा करण्याची संधी आहे. ऋतुराज प्रतिभावान आहे”, असं यॉर्कशायरचे कोच अँथनी मॅक्ग्राथ म्हणाले. त्यामुळे आता ऋतुराजला यॉर्कशायरकडून किती सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.