IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

| Updated on: Aug 30, 2021 | 2:22 PM

भारतीय संघाला लीडस कसोटीत (India Vs England, 3rd Test) एक डाव आणि 76 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे इंग्लंड संघाने मालिकेतील पहिला विजय मिळवत सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण
सूर्यकुमार यादव
Follow us on

Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्सच्या मैदानात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघ इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीतही सहज विजय मिळवेल असे वाटत होते. पण हेंडिग्ले येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत(India Vs England, 3rd Test) मात्र एक डाव आणि 76 धावांनी मोठा पराभव भारताला पत्करावा लागला. त्यामुळे आता चौथ्या कसोटीसाठी भारत काय रणनीती आखणार? कोणते बदल करणार? याचीच चर्चा सुरु आहे. दरम्यान शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेला सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी दिली जाण्याची चर्चा आहे. पण माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash chopra) या चर्चेला पूर्णविराम देत सूर्याला खेळवले जाणार नाही याचे कारण दिले आहे.

आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, ‘नाही, नाही सूर्यकुमार यादवला चौथ्या कसोटीत संधी मिळणार नाही. मला त्याचा खेळ आवडतो, पण त्याला खेळवण्याची कोणतेच कारण सध्या नाही. कारण त्याला कोणत्या खेळाडूच्या जागी खेळवलं जाऊ शकतं? तुम्ही सहा फलंदाज कसे खेळवू शकता?’ तसंच पुढे बोलताना चौप्राने याचे कारण सांगितले की, ‘सध्या खेळत असलेले रोहित, राहुल, पुजारा, कोहली, रहाणे आणि पंत यांच्यातील कोणालाच हटवता येणार नाही. त्यामुळे सूर्यकुमारला सध्यातरी संधी मिळणार नाही.’

‘आर. अश्विनला नक्की संधी मिळेल’

आकाश चोप्राने चौथ्या टेस्टमध्ये रवीचंद्रन अश्विनला खेळवण्याबाबत म्हटला की, ‘चौथी कसोटी असणाऱ्या ओवलच्या मैदानावर चेंडू चांगला स्पिन होतो. तसंच आश्विनला काऊंटी क्रिकेटमध्ये या मैदानावर खेळण्याचा अनुभवही आहे. त्यामुळे तिला नक्कीच संधी मिळेल.’

भारत आणि ओवलचं मैदान

ओवलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात 12 वेळा कसोटी सामने खेळवले गेले आहेत. ज्यात चार वेळा इंग्लंडने तर एका वेळेस भारताने विजय मिळवला आहे. याशिवाय 7 सामने अनिर्णीत सुटले आहेत. विशेष म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना याच मैदानावर 1936 मध्ये खेळवला गेला होता. ज्यात इंग्लंडने नऊ विकेट्सनी विजय मिळवला होता. तर या मैदानावर अखेरचा सामना 2018 साली खेळवला गेला असून यातही इंग्लंडनेच 118 धावांनी विजय मिळवला आहे. तसंच दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेने त्याच्या कारकिर्दीत ठोकलेल्या एकमेव शतकाच्या जोरावर 2007 साली भारताने ओवलच्या मैदानावर 664 धावांचा डोंगर उभा केला होता. यावेळी दिनेश कार्तिकने 91, राहुल द्रविडने 55, सचिन तेंडुलकरने 81, लक्ष्मणने 51 आणि महेंद्र सिंह धोनीने 92 धावांची खेली खेळी होती.

हे ही वाचा :

तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार

Cheteshwar Pujara : संयमी खेळीला शतकाचा साज नाहीच, चेतेश्वर पुजाराचं शतक पुन्हा हुकलं, दोन वर्षांपासून दुष्काळ!

(In india vs england 4th test Suryakumar will not get chance in playing 11 says aakash chopra)