Cheteshwar Pujara : संयमी खेळीला शतकाचा साज नाहीच, चेतेश्वर पुजाराचं शतक पुन्हा हुकलं, दोन वर्षांपासून दुष्काळ!

खराब फॉर्म आणि धिम्या स्ट्राईक रेटमुळे सतत टीकेचा सामना करणाऱ्या भारतीय कसोटी संघातील आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात चमकदार फलंदाजी केली.

Cheteshwar Pujara : संयमी खेळीला शतकाचा साज नाहीच, चेतेश्वर पुजाराचं शतक पुन्हा हुकलं, दोन वर्षांपासून दुष्काळ!

हेडिंग्ले : खराब फॉर्म आणि धिम्या स्ट्राईक रेटमुळे सतत टीकेचा सामना करणाऱ्या भारतीय कसोटी संघातील आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात चमकदार फलंदाजी केली. त्याची फलंदाजी पाहून असे वाटले की, पुजारा त्याचा दोन वर्षांचा शतकांचा दुष्काळ संपवेल. तो या दिशेने सहजतेने जात होता, पण तसे होऊ शकले नाही. पुजाराने शानदार फलंदाजी केली पण त्याला शतकाचा दुष्काळ संपवता आला नाही. 91 च्या वैयक्तिक धावसंख्येवर तो ऑली रॉबिन्सनच्या चेंडूवर पायचित झाला. 3 जानेवारी 2019 रोजी सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुजाराने आपले शेवटचे शतक झळकावले होते. त्या सामन्यात पुजाराने 193 धावांची खेळी केली होती. यानंतर त्याने काही अर्धशतकं झळकावली, मात्र त्याला त्याचे शतकात रुपांतर करता आले नाही. आजही त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. (Cheteshwar Pujara missed century against england at Headingly test)

पुजाराने शनिवारी चौथ्या दिवशी 91 धावांसह सुरुवात केली आणि त्याला त्याच्या खात्यात एकही धाव जोडता आली नाही. त्याने रॉबिन्सनचा एक चेंडू सोडला, मात्र तो चेंडू त्याच्या पॅडला लागला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अपील केले पण पंचांनी नाबाद दिले. इंग्लंडने यावर रिव्ह्यू घेतला आणि पुजाराला तिसऱ्या पंचांनी बाद घोषित केले. इथेच पुजाराचा शानदार डाव संपुष्टात आला, शतक पूर्ण न केल्यामुळे त्याला निराश व्हावे लागले आहे.

मालिकेत पहिलं अर्धशतक

पुजाराने यापूर्वी या मालिकेत 50 चा आकडादेखील ओलांडला नव्हता. या डावापूर्वी, या मालिकेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या 45 होती, जी त्याने लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केली होती. पुजाराची बॅट बराच काळ शांत होती, त्यामुळे त्याच्यावर सतत टीकाकारांचा हल्ला होत होता. त्याच्या स्ट्राइक रेट बद्दल पण बोलले जात होते, पण पुजाराने या सामन्यात त्यात सुधारणा केली, त्याने 48.14 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. पुजाराने आपल्या डावात 189 चेंडूंचा सामना केला आणि 15 चौकार लगावले. याआधी, जेव्हा त्याने लॉर्ड्सवर 45 धावा केल्या होत्या, तेव्हा त्याने 206 चेंडू खेळले होते.

अर्धशतकासाठी मोठी प्रतीक्षा

पुजाराने हे अर्धशतक पूर्ण करण्यासाठीदेखील बरीच वाट पाहिली आहे. या खेळीपूर्वी त्याने चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध 73 धावा केल्या होत्या. 13 डावांनंतर त्याने अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर सिडनीमध्ये पुजाराच्या शतकानंतर त्याने एकूण 37 डाव खेळले आहेत पण त्यात त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही.

इतर बातम्या

IND vs ENG : फॉर्मात परतलेल्या पुजाराच्या शॉटने अंपायरचं डोकं फुटलं असतं, पाहा थरारक Video

Eng vs Ind : आधी रुटचं शतक, मग रॉबिन्सनकडून टीम इंडियाचा ‘पंच’नामा, भारताचा डावाने पराभव

संघात स्थान न मिळाल्याने आश्विन फलंदाजीच्या सरावात व्यस्त, PHOTO केला शेअर, फोटो पाहून फॅन्सना पडला मोठा प्रश्न

(Cheteshwar Pujara missed century against england at Headingly test)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI