AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eng vs Ind : आधी रुटचं शतक, मग रॉबिन्सनकडून टीम इंडियाचा ‘पंच’नामा, भारताचा डावाने पराभव

तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इगंल्ंडच्या गोलंदाजांनी अवघ्या एका सत्रात टीम इंडियाचे 8 फलंदाज बाद केले. त्यामुळे भारताचा दुसरा डाव 278 धावांमध्ये संपुष्टात आला.

Eng vs Ind : आधी रुटचं शतक, मग रॉबिन्सनकडून टीम इंडियाचा 'पंच'नामा, भारताचा डावाने पराभव
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 28, 2021 | 5:44 PM
Share

हेडिंग्ले : तिसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात भारताला 78 धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला चांगली फलंदाजी करत तिसरा दिवस आपल्या नावे केला. मात्र चौथ्या दिवशी टीम इंडियाची पुन्हा एकदा घसरगुंडी पाहायला मिळाली. कालच्या 2 बाद 215 वरुन पुढे खेळणाऱ्या टीम इंडियाने आज एका सत्रात उर्वरित 8 विकेट्स गमावल्या. अखेर भारताचा डाव 278 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने या सामन्यात भारतावर एक डाव आणि 76 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. (England team beat India in third test by innings and 76 runs at Headingly level 5 match test series)

भारताने तिसऱ्या दिवसअखेर 80 षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 215 धावांपर्यंत मजल मारली होती. चेतेश्वर पुजारा 91 तर कर्णधार विराट कोहली 45 धावांवर नाबाद खेळत होते. त्यामुळे भारत सुस्थितीत होता. मात्र आजचा दिवस इंग्लंडच्या गोलंदाजांचा होता. इगंल्ंडच्या गोलंदाजांनी अवघ्या एका सत्रात टीम इंडियाचे 8 फलंदाज बाद केले. आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच पुजारा 91 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ विराट कोहली अर्धशतक करुन बाद. झाला. त्यानंतर विकेट्सची रांग लागली. अखेरच्या षटकात रवींद्र जाडेजाने थोडी फटकेबाजी करुन मनोरंजन केलं, मात्र तो भारताचा डावाने होणारा पराभव रोखू शकला नाही. दुसऱ्या डावात रोहित शर्मा, पुजारा आणि कोहली या तिघांनी अर्धशतकं झळकावली. मात्र त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या तिघांव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. अखेर भारताचा डाव 278 धावांमध्ये संपुष्टात आला. टीम इंडियाला पहिल्या डावात 78 तर दुसऱ्या डावात 278 धावा करता आल्या. त्यामुळे या सामन्यात भारताला एक डाव आणि 76 धावांनी पराभूत व्हावं लागलं आहे.

रॉबिन्सनकडून टीम इंडियाचा पंच’नामा

भारताच्या दोन्ही डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताचा डाव 78 धावांमध्ये आटोपला. तर दुसऱ्या डावात टीम इंडियाला केवळ 278 धावा करता आल्या. भारताच्या पहिल्या डावात इंग्लंडकडून जेम्म अँडरसनने 3, क्रेग ओव्हरटनने 3, मोईन अलीने 2 आणि ऑली रॉबिन्ससने 2 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात रॉबिन्ससने टीम इंडियाचा ‘पंच’नामा केला. त्याने या डावात 5 बळी घेतले. तर क्रेग ओव्हरटनने या डावातसुद्धा 3 विकेट घेतल्या. मोईन अली आणि जेम्म अँडरसनने प्रत्येकी एक विकेट घेतली. रॉबिन्सनला या सामन्यानंतर सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

भारताचा पहिला डाव

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतलेल्या भारतीय संघासाठी तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस अतिशय खराब ठरला होता. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार विराट कोहली याचा हाच निर्णय चुकीचा ठरताना दिसला. कारण प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांची सुरुवातच खराब झाली. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या 78 धावांवर तंबूत परतले. भारतीय संघाकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 19 धावा केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग आव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

इंग्लंडची जबरदस्त फलंदाजी

इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावांचा डोंग उभा केला होता. इंग्लंडकडून या डावात एक शतक तर तीन फलंदाजांनी अर्धशतकं फटकावली. सलामीवीर रॉरी बर्न्सने 61 धावांची खेळी केली तर हासीब हमीदने 68 धावांची खेळी केली. या दोघांनी 135 धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मलाने 70 धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जो रुटने या मालिकेतलं सलद तिसरं शतक ठोकलं. त्याने 14 चौकारांच्या मदतीने 121 धावांची खेळी केली. त्यानंतर पुढच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तीन अर्धशतकं आणि एका शतकाच्या जोरावर इंग्लंडने 432 धावा जमवल्या.

इतर बातम्या

IND vs ENG : फॉर्मात परतलेल्या पुजाराच्या शॉटने अंपायरचं डोकं फुटलं असतं, पाहा थरारक Video

IND vs ENG: जॉनी बेयरस्टो बनला सुपरमॅन, हवेत उडी घेत एका हातात पकडला झेल, पाहा VIDEO

संघात स्थान न मिळाल्याने आश्विन फलंदाजीच्या सरावात व्यस्त, PHOTO केला शेअर, फोटो पाहून फॅन्सना पडला मोठा प्रश्न

(England team beat India in third test by innings and 76 runs at Headingly level 5 match test series)

Follow Us
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार.....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....