IND vs ENG 3rd Test Day 4 Live : अँडरसन-रॉबिन्सनची कमाल, भारताचा डावाने पराभव, इंग्लंडची मालिकेत बरोबरी

भारताने तिसऱ्या दिवसअखेर 80 षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 215 धावांपर्यंत मजल मारली आहे. चेतेश्वर पुजारा 91 तर कर्णधार विराट कोहली 45 धावांवर नाबाद खेळत आहेत.

IND vs ENG 3rd Test Day 4 Live : अँडरसन-रॉबिन्सनची कमाल, भारताचा डावाने पराभव, इंग्लंडची मालिकेत बरोबरी

IND vs ENG 3rd Test Day 4 Live : तिसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात भारताला 78 धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला चांगली फलंदाजी करत तिसरा दिवस आपल्या नावे केला. मात्र चौथ्या दिवशी टीम इंडियाची पुन्हा एकदा घसरगुंडी पाहायला मिळाली. कालच्या 2 बाद 215 वरुन पुढे खेळणाऱ्या टीम इंडियाने आज एका सत्रात उर्वरित 8 विकेट्स गमावल्या. अखेर भारताचा डाव 278 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने या सामन्यात भारतावर एक डाव आणि 76 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

Match Highlights

 • रॉबिन्सनकडून टीम इंडियाचा ‘पंच’नामा

  भारताच्या दोन्ही डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताचा डाव 78 धावांमध्ये आटोपला. तर दुसऱ्या डावात टीम इंडियाला केवळ 278 धावा करता आल्या. भारताच्या पहिल्या डावात इंग्लंडकडून जेम्म अँडरसनने 3, क्रेग ओव्हरटनने 3, मोईन अलीने 2 आणि ऑली रॉबिन्ससने 2 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात रॉबिन्ससने टीम इंडियाचा ‘पंच’नामा केला. त्याने या डावात 5 बळी घेतले. तर क्रेग ओव्हरटनने या डावातसुद्धा 3 विकेट घेतल्या. मोईन अली आणि जेम्म अँडरसनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

 • पहिल्या डावात भारताची घसरगुंडी

  नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतलेल्या भारतीय संघासाठी तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस अतिशय खराब ठरला होता. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार विराट कोहली याचा हाच निर्णय चुकीचा ठरताना दिसला. कारण प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांची सुरुवातच खराब झाली. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या 78 धावांवर तंबूत परतले. भारतीय संघाकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 19 धावा केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग आव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 28 Aug 2021 17:16 PM (IST)

  भारताचा अखेरचा फलंदाज बाद, इंग्लंडची भारतावर एक डाव आणि 76 धावांनी मात

  img

  भारताने 10 वी विकेट गमावली आहे. क्रेग ओव्हरटनने मोहम्मद सिराजला जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद करत भारताचा डाव संपुष्टात आणला आहे. भारताने या डावात 278 धावा केल्या.

 • 28 Aug 2021 17:12 PM (IST)

  भारताचा 9 वा गडी माघारी, रवींद्र जाडेजा 30 धावांवर बाद

  img

  भारताने 9 वी विकेट गमावली आहे. ऑली रॉबिन्सनने रवींद्र जाडेजाला 30 धावांवर असताना विकेटकीपर जॉस बटलरकरवी झेलबाद केलं. (भारत 278/9)

 • 28 Aug 2021 16:57 PM (IST)

  भारताचा 8 वा गडी माघारी, इशांत शर्मा 2 धावांवर बाद

  img

  भारताचा 8 वा गडी माघारी परतला आहे. ऑली रॉबिन्सनने इशांतला 2 धावांवर असताना विकेटकीपर जॉस बटलरकरवी झेलबाद केलं. (भारत 257/8)

 • 28 Aug 2021 16:49 PM (IST)

  भारताचा सातवा गडी माघारी, मोहम्मद शमी 6 धावांवर बाद

  img

  भारताने सातवी विकेट गमावली आहे. मोईन अलीने मोहम्मद शमीला 6 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (भारत 254/7)

 • 28 Aug 2021 16:37 PM (IST)

  भारताचा सहावा फलंदाज माघारी, रिषभ पंत बाद

  img

  भारताने अजिंक्य रहाणेपाठोपाठ अजून एक विकेट गमावली आहे. ऑली रॉबिन्सनने रिषभ पंतला क्रेग ओव्हरटनकरवी झेलबाद केलं. (भारत 239/6)

 • 28 Aug 2021 16:32 PM (IST)

  भारताला पाचवा झटका, अजिंक्य रहाणे 10 धावांवर बाद

  img

  विराट कोहलीपाठोपाठ भारताने पाचवी विकेट गमावली आहे. अजिंक्य रहाणे 10 धावांवर असताना जेम्स अँडरसनने त्याला यष्टीरक्षक जॉस बटलरकरवी झेलबाद केलं.

 • 28 Aug 2021 16:21 PM (IST)

  भारताला मोठा झटका, विराट कोहली 55 धावांवर बाद

  img

  भारताने चौथी विकेट गमावली आहे. 90 व्या षटकात ऑली रॉबिन्सनने विराट कोहलीला जो रुटकरवी झेलबाद केलं. (भारत 237/4)

 • 28 Aug 2021 16:20 PM (IST)

  रॉबिन्सनला चौकार, विराट कोहलीचं अर्धशतक

  img

  90 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ऑली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने शानदार चौकार लगावत अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटने 120 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली आहे. याच षटकातील 5 व्या चेंडूवर विराटने आणखी एक चौकार लगावला (भारत 237/3)

 • 28 Aug 2021 15:49 PM (IST)

  भारताला मोठा झटका, चेतेश्वर पुजारा 91 धावांवर बाद

  img

  भारताने आजच्या दिवसातीत चौथ्याच षटकात महत्त्वाची विकेट गमावली आहे. ऑली रॉबिन्सनने चेतेश्वर पुजाराला पायचित केलं. (भारत 215/2)

 • 28 Aug 2021 15:33 PM (IST)

  चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात, पुजारा-विराट जोडी मैदानात

  चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली असून चेतेश्वर पुजारा (91) आणि विराट जोडी (45) मैदानात दाखल झाली आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI