IPL 2021 : आरसीबी संघाला मोठा झटका, दुखापतीमुळे धाकड खेळाडू संघाबाहेर, बदली खेळाडू म्हणून ‘या’ युवा खेळाडूची निवड

आरसीबी संघातील एका महत्त्वाच्या अष्टपैलू खेळाडूला दुखापत झाल्यामुळे तो स्पर्धेबाहेर गेला आहे. त्याच्या जागी एका अगदी युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

IPL 2021 : आरसीबी संघाला मोठा झटका, दुखापतीमुळे धाकड खेळाडू संघाबाहेर, बदली खेळाडू म्हणून या युवा खेळाडूची निवड
आरसीबी संघ
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 12:35 PM

दुबई : आगामी आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाला (IPL 2021) 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये (UAE) सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील उर्वरीत 31 सामने खेळण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. एक एक संघ युएईला पोहचत असून नुकताच  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांचा संघही युएईला पोहोचला आहे. पण संघासाठी एक वाईट बातमी समोर आली असून संघातील धाकड अष्टपैलू खेळाडू वॉशिग्टंन सुंदर (Washington Sundar) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे.

इंग्लंडच्या दौऱ्यावर त्याला झालेली दुखापत अजून ठिक झाली नसल्याने तो आयपीएलमध्येही खेळणार नाही. त्याच्या बोटाला दुखापत झाल्याने सुंदरवर उपचार सुरु होते. पण अजूनही तो ठिक झाला नसल्याने त्याने आयपीएलमधूनही माघार घेतली आहे. आतापर्यंत झालेल्या यंदाच्या आयपीएलमध्ये वॉशिंग्टनने 6 सामन्यात 31 केले असून 3 विकेटही मिळवल्या आहेत.

सुंदरच्या जागी आकाश दीपला संधी

आरसीबी संघाने वॉशिंगटन सुंदरला बदली खेळाडू म्हणून बंगालचा वेगवान गोलंदाज आकाश दीपला संधी देण्यात आली आहे. आकाशदीप सध्या आरसीबी संघासाठी नेट बोलरच्या भूमिकेत होता. भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज  श्रीवत्स गोस्वामी यांच्या मते आकाशदीप एक उत्तम गोलंदाज असल्याने त्याला नक्कीच संधी मिळू शकेल.

आरसीबी संघात चार नवे बदल

आरसीबी संघाने सर्वात मोठा बदल म्हणजे श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणाऱ्या श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा  याला करारबद्ध केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅडम झाम्पाच्या जागी हसरंगाला  घेण्यात आलं आहे.  हसरंगासह श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू यासह दुष्मंथा चमिरा यालादेखील आरसीबीने संघात घेतलं आहे. तो केन रिचर्डसनच्या बदली खेळणार आहे. तर टीम डेव्हिड हा फिन एलनला रिप्लेस करणार आहे. तर केन रिचर्डसनला जिओर्जी गार्टोन बदली खेळाडू म्हणून खेळणार आहे.

हे ही वाचा :

सलामीच्या सामन्यात दमदार अर्धशतक, स्थानिक क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा, तरीही 10 सामन्यात कारकीर्द संपुष्टात

भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटूचा तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतला संन्यास

रहाणे, पुजारा, ईशांतला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती? 3 नव्या खेळाडूंची नावं चर्चेत, प्लेईंग इलेव्हन बदलणार

(In IPL 2021 Washington sundar has been ruled out due to injruy akash deep will replace him)