AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलामीच्या सामन्यात दमदार अर्धशतक, स्थानिक क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा, तरीही 10 सामन्यात कारकीर्द संपुष्टात

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये या खेळाडूने 10 हजाराहून अधिक धावा केल्या. तसेच आयपीएलमध्येही उत्तम फलंदाजी केली. पण या सर्वानंतरही भारताकडून मात्र तो केवळ 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला.

सलामीच्या सामन्यात दमदार अर्धशतक, स्थानिक क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा, तरीही 10 सामन्यात कारकीर्द संपुष्टात
सुब्रमण्यम बद्रीनाथ
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 11:41 AM
Share

चेन्नई : भारतीय संघातील एका अशा माजी खेळाडूचा आज वाढदिवस आहे, जो आपल्या विश्वासून फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. पण भारतीय संघातून अवघे हातावर मोजण्याइतकेच सामने खेळू शकला. संघा अनेक दिग्गज खेळाडू  असल्याने त्याची  क्रिकेट कारकीर्द अधिक काळाची होऊ शकली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणाऱ्या या खेळाडूने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली होती. पण तरी भारताकडून खेळताना त्याला फार कमी संधी मिळाली. या क्रिकेटपटूचे नाव सुब्रमण्यम बद्रीनाथ (Subramaniam Badrinath) आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये तमिळनाडू संघातील महत्त्वाचा फलंदाज खेळणारा बद्रीनाथ भारतासाठी दोन कसोटी सामन्यांसह केवळ 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला.

बद्रीनाथने भारताकडून तिन्ही क्रिकेट प्रकारात सामने खेळले. पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने अर्धशतक झळकावलं. तर एकदिवसीय सामन्यात विजयी खेळी खेळली. तर टी-20 सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला.  बद्रीनाथने प्रथन श्रेणी क्रिकेटमध्ये 145 सामन्यात 54.49 च्या सरासरीने 10 हजार 245 धावा केल्या ज्यामध्ये 32 शतकं ठोकली. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 144 सामन्यात 36.84 च्या सरासरीने 4 हजार 164 धावा केल्या. याशिवाय स्थानिक 142 टी-20 सामन्यात 2 हजार 300 धावा बनवल्या. भारताकडून मात्र सात एकदिवसीय सामन्यात केवळ 79 धावाच बद्रीनाथ करु शकला. 2011 मध्ये तो अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.

सलामीच्या टी20 सामन्यात सामनावीर, तरीही पुन्हा संधी नाही

बद्रीनाथने 2010 मध्ये दक्षिण आफ्रीका विरुद्धच्या कसोटी मालिकेत डेब्यू केला. पहिल्या सामन्यातच त्याने 56 धावा करत अर्धशतक ठोकलं. पण त्यानंतर तो केवळ एकच कसोटी सामना खेळला. तर 2011 मध्ये वेस्ट इंडीज संघाविरुद्ध त्याने टी-20 डेब्यू केला. या सामन्यात 43 महत्त्वाच्या धावा करत त्याने सामनावीराचा पुरस्कार मिळवला. पण त्यानंतर त्याला पुन्हा संधी मिळाली नाही. तो फलंदाजीसह गोलंदाजीही करत असता तर त्याला आणखी संधी मिळाली असती असं म्हटलं जातं.

हे ही वाचा :

भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटूचा तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतला संन्यास

रहाणे, पुजारा, ईशांतला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती? 3 नव्या खेळाडूंची नावं चर्चेत, प्लेईंग इलेव्हन बदलणार

तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार

(Indian Cricketer subramaniam badrinath birthday on this day who retired very early)

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.