IND vs AFG : इंडिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी अफगाणिस्तान टीमची घोषणा, कॅप्टन कोण?

Afghanistan Tour Of India 2026 : राशिद खान आणि मोहम्मद नबी या अनुभवी खेळाडूंनाही एकदिवसीय मालिकेत संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ही अनुभवी जोडी टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

IND vs AFG : इंडिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी अफगाणिस्तान टीमची घोषणा, कॅप्टन कोण?
Rashid Khan Afghanistan
Image Credit source: PTI
| Updated on: May 27, 2026 | 5:47 PM

आयपीएल 2026 स्पर्धेनंतर (IPL 2026) टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध एकूण 4 सामने खेळणार आहे. अफगाणिस्तान टीम आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची सांगता झाल्यानंतर भारत दौऱ्यावर येणार आहे. अफगाणिस्तान या दौऱ्यात यजमान टीम इंडिया विरुद्ध एकमेव कसोटी सामना आणि 3 मॅचची वनडे सीरिज खेळणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी टीम जाहीर केली आहे. हशमतुल्लाह शाहीदी अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही एकमेव कसोटी सामन्याने होणार आहे.मात्र आपण एकिदवसीय मालिकेबाबत जाणून घेऊयात. त्याचं कारणही तसंच आहे. उभयसंघात एकदिवसीय द्विपक्षीय मालिका खेळवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. अफगाणिस्तानने आतापर्यंत अनेक संघांना झुंजवलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तान भारताविरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडिया अफगाणिस्तानवर वरचढ

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 4 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने या 4 पैकी 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर उभयसंघातील 1 सामना बरोबरीत सुटला होता. अफगाणिस्तानला आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये विजयी होता आलेलं नाही. त्यामुळे अफगाणिस्तान भारत दौऱ्यात टीम इंडियाला पराभूत करुन पहिला वनडे विजय मिळवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 13 जून, धर्मशाला

दुसरा सामना, 17 जून, लखनौ

तिसरा सामना, 20 जून, चेन्नई

टीम इंडिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी अफगाणिस्तान टीम : हशमतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमत शाह, नेंगेयालिया खारोटे, रहमनुल्लाह गुरबाज, इकराम अली, अल्लाह गजनफर, इब्राहिम झाद्रान, मोहम्मद नबी, जियाउर रहमान, सेदिकुल्लाह अटल, अजमतुल्लाह ओमरजई, फरीद अहमद, दार्विश रसूली, राशिद खान आणि बिलाल समी.

शुबमन गिल याच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्व

दरम्यान बीसीसीआयने 19 मे रोजी अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. त्यानुसार शुबमन गिल अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. विराट कोहली याचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर रोहित शर्मा खेळणार की नाही? हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल असं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Follow Us