IND vs AUS 1st T20I Toss | टीम इंडियाने टॉस जिंकला, कॅप्टन सूर्यकुमारचा कांगारुं विरुद्ध मोठा निर्णय

IND vs AUS 1st T20i Toss | टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात टॉस जिंकला आहे. सूर्यकुमार यादव याचा कर्णधार म्हणून हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. पाहा दोन्ही टीमची प्लेईंग ईलेव्हन.

IND vs AUS 1st T20I Toss | टीम इंडियाने टॉस जिंकला, कॅप्टन सूर्यकुमारचा कांगारुं विरुद्ध मोठा निर्णय
ind vs aus 2st t20 toss
| Updated on: Nov 23, 2023 | 7:13 PM

विशाखापट्टणम | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर आता टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरुद्ध 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत 2 हात करणार आहेत. या मालिकेतील पहिला सामन्याला थोड्याच वेळात संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा आहे. तर मॅथ्यु वेड ऑस्ट्रेलियाची सूत्र सांभाळणार आहे. या सामन्याचं आयोजन हे विशाखापट्टणममधील डॉक्टर वायएस राजशेखरा रेड्डी एसीए वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याच्या 30 मिनिटांआधी साडे सहा वाजता टॉस करण्यात आला. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आहे.

कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात सूर्यकुमार यादव याच्या बाजूने टॉसचा निर्णय लागला. कॅप्टन सूर्यकुमारने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. सूर्याने टीममध्ये ऋतुराज आणि ईशान या दोघांनाही संधी दिली आहे. दोघेही विकेटकीपर असल्याने एकालाच संधी मिळणार अशी चर्चा होती. मात्र सूर्याने या दोघांचा समावेश केलाय.

सूर्यकुमार यादव टॉसनंतर काय म्हणाला?

“खेळपट्टी चांगली आहे,त्यानंतर ड्यू येऊ शकतो, ज्यामुळे पिच आणखी चांगली होईल. हे थोडं अवघड होईल. या मालिकेसाठी आम्ही उत्साही आहोत. टीममधील युवा खेळाडूंनी फ्रँचायजी आणि देशांतर्गत स्पर्धेत क्रिकेट खेळलंय. तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळा असं त्यांना म्हटलं. तर वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे आणि आवेश खान या तिघांना प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही.”, असं सुर्यकुमार टॉसनंतर म्हणाला.

सूर्यकुमारचा कर्णधारपदाचा अनुभव

दरम्यान सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा 13 वा टी 20 कॅप्टन ठरला आहे. सूर्यकुमार यादव याने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये 17 सामन्यात नेतृत्व केलं आहे. सूर्याच्या नेतृत्वात या 17 पैकी 11 सामन्यात विजय झाला आहे. तर 6 सामन्यांमध्ये सूर्यकुमारला कर्णधार म्हणून अपयश आलं आहे.

टीम इंडियाने टॉस जिंकला


ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस, अॅरॉन हार्डी, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, शॉन एबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तनवीर संघा.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन | ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि प्रसीध कृष्णा.