IND vs AUS : 4 वर्षापूर्वीची जुनी समस्या, थरथरले भारतीय बॅट्समन, हेच आहे पराभवाच मुख्य कारण

| Updated on: Mar 20, 2023 | 8:31 AM

IND vs AUS 2nd ODI : टीम इंडियाला या समस्येवर उत्तर कधी सापडणार? असंच सुरु राहिलं, तर टीम इंडिया वर्ल्ड कप कसा जिंकणार?. खासकरुन मुंबई आणि विशाखापट्टनममधील चित्र पाहिल्यानंतर असच वाटतं.

IND vs AUS : 4 वर्षापूर्वीची जुनी समस्या, थरथरले भारतीय बॅट्समन, हेच आहे पराभवाच मुख्य कारण
ind vs aus 2nd odi
Image Credit source: PTI
Follow us on

IND vs AUS 2nd ODI : वनडे वर्ल्ड कप जास्त लांब नाहीय. फक्त 7 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. अनेक मोठ्या टीम्स भारतात येऊन, जेतेपदासाठी दावेदारी ठोकणार आहेत. या वर्ल्ड कपआधी 12 वर्षापूर्वी भारतात वनडे वर्ल्ड कप झाला होता. त्यावेळी टीम इंडियाने दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकलेला. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीमवर वर्ल्ड कपमध्ये जेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी असेल. वर्ल्ड कपला 7 महिने उरलेले असताना टीम इंडियाची कामगिरी फार उत्साहवर्धक दिसत नाहीय. खासकरुन मुंबई आणि विशाखापट्टनममधील चित्र पाहिल्यानंतर असच वाटतं.

दोन महिन्यांपूर्वी श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाने स्फोटक बॅटिंग केली होती. तीच टीम आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीजमध्ये हतबल दिसतेय. मुंबईमध्ये पहिला वनडे सामना जिंकला. पण टीम इंडियाची जशी सुरुवात झाली, त्यामुळे विजयाच्या आनंदापेक्षा टेन्शन जास्त आहे.

स्टार्कच नाही, त्या दोघांनी सुद्धा अडचणी वाढवल्या

रविवारी दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा डाव 117 धावात आटोपला. डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 5/53 टीम इंडियाची वाट लावली. मुंबईत पहिल्या वनडेमध्ये स्टार्कशिवाय शॉन एबॉट आणि नाथन एलिस या कमी अनुभवी गोलंदाजांनी सुद्धा भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या.

टीम इंडियाची काय समस्या आहे?

मागच्या 4 वर्षांपासून टीम इंडिया एका समस्येचा सामना करतेय. त्यावर अजून उत्तर सापडलेलं नाही. चेंडू स्विंग होतो, तेव्हा भारतीय फलंदाज अपयशी ठरतात. वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थितीत फलंदाजांच्या अडचणी वाढणं स्वाभाविक आहे. पण भारतीय टीम यामुळे जास्त त्रस्त आहे.

अशी हालत कधी झालेली?

मँचेस्टरमध्ये 2019 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये चेंडू जितका स्विंग होत होता, तितका चेंडू विशाखापट्टनममध्ये स्विंग होत नव्हता. पण, तरीही टीम इंडियाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. फक्त 10 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 5 विकेट गमावले. याआधी मुंबईत 11 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 39 रन्सवर 4 विकेट गमावले होते.

त्यावेळी दोघांनी भारतीय फलंदाजीची वाट लावलेली

चार वर्षापूर्वी न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड़ कप सेमीफायनलमध्ये हेनरी आणि ट्रेंट बोल्टने भारतीय फलंदाजीची वाट लावलेली. पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत यामध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. पण मुंबई आणि विशाखापट्टनममधील स्थिती पाहिल्यानंतर यात काही सुधारणा झालीय असं वाटत नाही.