AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Live Streaming | दुसरा एकदिवसीय सामना टीव्ही-मोबाईलवर फुकटात कुठे पाहता येणार?

IND vs AUS 2nd ODI Live Streaming | टीम इंडिया केएल राहुल याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. हा सामना कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार हे सर्व एका क्लिकवर जाणून घ्या.

IND vs AUS Live Streaming | दुसरा एकदिवसीय सामना टीव्ही-मोबाईलवर फुकटात कुठे पाहता येणार?
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Sep 23, 2023 | 7:21 PM
Share

इंदूर | टीम इंडियाने शुक्रवारी 22 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने विजयी सलामी दिली. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आयसीसी वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या मालिकेत दमदार कामगिरी करण्याचा मानस आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया सज्ज आहेत. हा दुसरा सामना कधी आणि कुठे होणार, कुठे पाहता येणार हे सर्व आपण जाणून घेऊयात.

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना केव्हा?

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय रविवारी 24 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दुसरा सामना कुठे खेळवण्यात येणार?

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर दुपारी 1 वाजता टॉस होईल.

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दुसरा सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दुसरा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर पाहता येईल. तर फ्रीमध्ये डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दुसरा सामना मोबाईलवर फ्री कुठे पाहायला मिळणार?

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दुसरा सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल. जिओ सिनेमा एपवर एकूण 12 भाषांमध्ये सामन्याची कॉमेंट्री ऐकता येणार आहे.

वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया

केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित पवारांना थेट सवाल!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू