IND vs AUS | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून हा मॅचविनर बॅट्समन बाहेर

| Updated on: Mar 18, 2023 | 8:19 PM

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना हा विशाखापट्टणम इथे खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियातून 1 खेळाडू हा आऊट होणार आहे. नक्की तो स्टार खेळाडू कोण आहे, हे जाणून घ्या.

IND vs AUS | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून हा मॅचविनर बॅट्समन बाहेर
Follow us on

मुंबई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना 5 विकेट्सने जिंकला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 5 विकेट्स गमावून 189 धावांचं आव्हान पूर्ण केलं. केएल राहुल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपयशी ठरत होता. यामुळे त्याच्यावर टीका केली जात होती.मात्र केएलने टीम इंडिया अडचणीत असताना एकाकी झुंज दिली. दुसऱ्या बाजूने रविंद्र जडेजा याने केएलला चांगली साथ दिली. यासह टीम इंडियाने जोरदार कमबॅक करत कांगारुंवर विजय मिळवला. स्वसतात 5 विकेट्स गमावल्यानंतर जडेजा आणि केएल या दोघांनी नाबाद 108 धावांनी नाबाद विजयी भागारीदारी रचली. यासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

दरम्यान आता या मालिकेतील दुसरा सामना हा रविवारी 19 मार्च रोजी विशाखापट्टणम इथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा याचं कमबॅक होतंय. पहिल्या सामन्यात रोहित कौटुंबिक कारणामुळे खेळला नव्हता. मात्र आता रोहित परतत असल्याने टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमधून एका खेळाडूला बाहेर बसावं लागणार हे निश्चित आहे. शुबमन गिल किंवा इशान किशन या दोघांपैकी एकाचा प्लेइंग इलेव्हनमधून पत्ता कट होणार असल्याचं स्पष्ट आहे. विशेष म्हणजे या दोघांनी वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकण्याचा कारनामा केलाय. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात हे दोघेही फ्लॉप ठरले होते.

त्यामुळे आता दुसऱ्या वनडे सामन्यात रोहितसाठी शुबमन की इशान या दोघांपैकी कोण बलिदान देणार, हे काही तासांमध्येच स्पष्ट होणार आहे. दरम्यान हा दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉक्टर वाय एस राजशेखर रेड्डी एसीए वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे.

हे सुद्धा वाचा

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल आणि जयदेव उनादकट.

टीम ऑस्ट्रेलिया | स्टीवहन स्मिथ (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स केरी, नाथन एलिस, कॅमरन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिश, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि एडम झॅम्पा.