
इंदोर : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये ‘प्रिन्स’ शुबमन गिल याने शतक केलं आहे. सुरूवातीपासूनच सेट होऊन आलेल्या शुबमन गिल याने सहावं शतक झळकलं आहे. शबमन गिलने 92 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं आहे. इंदूरच्या मैदानावर गिलने दुसरं शतक पूर्ण केलंय. भारतासाठी यंदाच्या वर्षातील शुबमन गिल याने पाचवं शतक मारलं आहे. शुबमनसोबत भारताचा भरवशाचा खेळाडू श्रेयस अय्यर यानेही शतकी खेळी करत भारताला मजबूत स्थितीत नेलं.
शुबमन गिल याने आशिया कपमध्ये बांगलादेशविरूद्धच्या सामन्यामध्ये शतक केलं होतं. पाचव्या शतकाला अद्याप दहा दिवस पूर्ण झाले नाहीतर तर पठ्ठ्याने कांगारूंच्या गोलंदाजांचा घाम काढला आहे. शतक झाल्यावर आक्रमक खेळ करण्याच्या नादात तो कॅचआऊट झाला. 97 बॉलमध्ये गिलने 104 धावा केल्या यामध्ये त्याने सहा चौकार तर चार षटकार मारले.
शुबमन गिल याने 35 डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत अग्रस्थान मिळवलं आहे. शुबमन याने 1895 धावा केल्या आहेत. याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमलाच्या नावावर होता. इतकंच नाहीतर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके केली आहेत. शुबमन गिलसोबत श्रेयस अय्यरनेही आपलं तिसरं शतक पूर्ण केलं असून दोघांनी पहिली विकेट गेल्यानंतर भारताचा डाव सावरत द्विशतकी भागीदारी केली.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ (C), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (W), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W/C), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा