
इंदूर | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामन्याला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. हा दुसरा सामना 24 सप्टेंबरला पार पडणार आहे. हा सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका खिशात घालण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र या दुसऱ्या सामन्यात पावसाची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. इंदूरमध्ये रविवारी पाऊस हजेरी लावू शकतो. पावसाने पहिल्या सामन्यातही हजेरी लावली. त्यामुळे सामना थांबवण्यात आला होता. मात्र पावसामुळे सामन्यावर काही फरक पडला नाही
इंदूरमध्ये रविवारी पाऊस होण्याचा अंदा आहे. मात्र मुसळधार स्वरुपाचा पाऊस नसेल. त्यामुळे सामन्याचा निकाल लागणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. मात्र पावसामुळे सामन्याचा खेळखंडोबा होऊ शकतो. पाऊस सामन्यात खोडा घालून क्रिकेट चाहत्यांना मूड ऑफ करु शकतो.
सामन्याला दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी दुपारी 12 वाजता पाऊस होण्याची शक्यता ही 23 टक्के आहे. तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या 3 तासांदरम्यान पाऊस बरसण्याची 24 टक्के शक्यता आहे. रात्री पावसाच्या हजेरीची 19 टक्के इतका अंदाज आहे. हवामान खात्याच्या एकूण अंदाजानुसार, पाऊस सामन्यात विघ्न घालेल पण त्याच्यामुळे द एन्ड होणार नाही. मात्र ढगाळ वातावरण असेल त्यामुळे गोलंदाजांना मदत मिळेल.
ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.
केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.