
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने एकदिवसीय मालिका गमावली. त्यानंतर सूर्यकुमार यादव याच्याही नेतृत्वात टीम इंडियाने टी 20i मालिकेतील सुरुवात पराभवानेच केली. पहिला सामना पावसाने ढापला. तर ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना हा 4 विकेट्सने जिकंत मालिकेत मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. त्यामुळे भारतासमोर तिसऱ्या सामन्यात कमबॅक करण्याचं आव्हान आहे. सूर्यासेना तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या मॅचमधील पराभवाची परतफेड करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. मात्र दुसर्या सामन्यातील पराभवानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करु शकतो. त्यामुळे प्लेइंग ईलेव्हनमध्ये किती बदल होऊ शकतात? हे आपण जाणून घेऊयात.
पावसामुळे पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात फक्त 9.4 ओव्हरचाच खेळ झाला. पावसामुळे सामना रद्द झाल्याने भारताची बॉलिंग करण्याची वेळ आली नाही. मात्र टीम इंडियाचा सर्वात यशस्वी टी 2oi बॉलर अर्शदीप सिंग याला पहिल्या सामन्यात संधी देण्यात आली नाही. अर्शदीपला दुसऱ्या सामन्यातूनही वगळण्यात आलं. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात तरी अर्शदीपला संधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अर्शदीपला हर्षित राणा याच्या जागी संधी दिली जाऊ शकते.
भारताला दुसऱ्या टी 20i सामन्यात तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची उणीव जाणवली. तर दुसर्या बाजूला चायनामॅन फिरकीपटू कुलदीप यादव याने अवघ्या 20 बॉलमध्ये अर्थात 3.2 ओव्हरमध्ये 45 धावा लुटवल्या. कुलदीपने 2 विकेट्स घेतल्या. मात्र त्याने जवळपास 14 च्या इकॉनमीने धावा दिल्या. त्यामुळे कॅप्टन सूर्याकडून कुलदीपच्या जागी ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला संधी दिली जाऊ शकते.
दुसऱ्या टी 20i सामन्यात अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा या दोघांचा अपवाद वगळता इतर 9 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. फलंदाजांनी कांगारुंच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. संजू सॅमसन याने बॅटिंग आणि विकेटकीपिंगही निराशाजनक केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टी 20i सामन्यासाठी संजूच्या जागी विकेटकीपर म्हणून जितेश शर्मा याला संधी मिळणार का? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.
तिसर्या टी 20I मॅचसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन/जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह अक्षर पटेल, हर्षित राणा/अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव/वॉशिंग्टन सुंदर.