INDvsAUS | टीम इंडियाला चौथ्या कसोटीत भीमपराक्रम करण्याची संधी

टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 2-1 च्या फरकाने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना 9 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे.

INDvsAUS | टीम इंडियाला चौथ्या कसोटीत भीमपराक्रम करण्याची संधी
team india
| Updated on: Mar 07, 2023 | 8:31 PM

अहमदाबाद | टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीची शानदार पद्धतीने सुरुवात केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर नागपूर आणि त्यानंतर दिल्ली कसोटीत एकतर्फी फरकाने विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाला तेव्हा इंदूर कसोटी जिंकून मालिका विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पोहचण्याची संधी होती. मात्र तिसऱ्या सामन्यात मोठा उलटफेर झाला. ऑस्ट्रेलियाने जोरदार मुसंडी मारत टीम इंडियाचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेतील खातं उघडलं. तसेच wtc final मध्ये धडक मारली. मात्र यामुळे टीम इंडियाची wtc final साठी प्रतिक्षा वाढली. तसेच महारेकॉर्ड करण्याची संधी हुकली.

मात्र यानंतरही टीम इंडियाला अहमदाबादमधील चौथा कसोटी सामना जिंकून महारेकॉर्ड करण्याची संधी आहे.
भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत सलग एकूण 15 टेस्ट सीरिज जिंकण्याची कामगिरी केली आहे. यामुळे अहमदाबादमधील चौथा सामना जिंकून टीम इंडियाला आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड आणखी मजबूत करण्याची संधी आहे. टीम इंडियाप्रमाणे आतापर्यंत सलग इतक्या वेळा होम टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही.

टीम इंडियाने नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका गमावली होती. त्यानंतर टीम इंडिया भारतात सलगपणे टेस्ट सीरिज जिंकत आली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियाने आपल्या घरात 2 वेळा सलग 10 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. टीम इंडियाने भारतात गेल्या 45 कसोटी सामन्यांपैकी फक्त 3 सामने गमावले आहेत.

टीम इंडियाची घरातली आकडेवारी

भारतीय क्रिकेट संघाने 2013 या वर्षापासून ते आतापर्यंत एकूण 45 कसोटी सामने खेळले आहेत. यात टीम इंडियाने 36 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर 3 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत.

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया

टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.

टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट.