Video : पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची दोनदा झाली फजिती, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडिया बॅकफूटवर आली आहे. असं असलं तरी पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाची भर मैदानात दोनदा फजिती झाली. यामुळे वेगवान गोलंदाज हर्षित राणाही वैतागला. तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ऑस्ट्रेलियाची फिरकी घेतली.

Video : पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची दोनदा झाली फजिती, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
| Updated on: Dec 06, 2024 | 6:48 PM

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर मजबूत पकड मिळवली आहे. टीम इंडियाला पहिल्या डोकंच वर काढू दिलं नाही. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताची सुरुवातच विकेटने झाली. पहिल्याच चेंडूवर स्टार्कने यशस्वी जयस्वालला गोलंदाजीचा वेग दाखवला. पायचीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर भारतीय फलंदाज खेळपट्टीवर हजेरी लावून जात असल्याचं दिसून आलं. भारताला सर्व गडी बाद 180 धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली. उस्मान ख्वाजा बाद झाल्यानंतर नाथन मॅकस्वीनी आणि मार्नस लाबुशेनने डाव सावरला. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 1 गडी बाद 86 धावा झाल्या आहेत. अजूनही भारताकडे 94 धावांची आघाडी आहे. असं असातना या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला. हा प्रकार एकदा नाही तर दोनदा झाला. डे नाईट सामन्यात दोन लाईट गेली. त्यामुळे भारतीय खेळाडू चांगलेच संतापले होते. इतकंच काय तर पंचही या प्रकारामुळे वैतागले होते. कारण दोन वेळा सामना थांबवण्याची वेळ आली.

संघाचं 18 वं षटक टाकण्यासाठी रोहित शर्माने हार्षित राणाकडे चेंडू सोपवला होता. तेव्हा मॅकस्विनी स्ट्राईकवर होता. तिसरा चेंडू टाकणार तेवढ्यात फ्लड लाईट बंद झाली. मैदानात अंधार पसरला. मैदानात उपस्थित असलेले क्रीडाप्रेमीही आरडाओरड करू लागले. काही वेळात लाईट आली. पण तितका वेळ सामना थांबवावा लागला. या प्रकारानंतर हार्षित राणाने दोन चेंडू टाकले. पाचवा चेंडू टाकण्यासाठी हार्षित तयार झाला आणि पुन्हा एकदा लाईट गेली. हा प्रकार पाहून कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत हसू लागले. पण हार्षित राणा नाराज झाला होता. कारण त्याच्या गोलंदाजीची लय तुटत होती.

लाईट गेल्याचा आनंद मैदानात उपस्थित असलेल्या क्रीडारसिकांनी घेतला.मोबाईलच्या फ्लॅश लाईट पेटवत अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळाने पुन्हा लाईट आली आणि सामना सुरु झाला. या प्रकाराची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. एका युजर्सने लिहिलं की, ‘कोणीच सांगितलं नाही डे नाईट सामना विना लाईटचा असतो.’ तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं की, ‘एडिलेडमध्ये लाइट ऑन ऑफ खेळत आहे.’