
मोहाली | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा 22 सप्टेंबरला पार पडणार आहे. हा सामना पंजाबमधील मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये आयोजित केला गेला आहे. टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघाांसाठी त्यातही ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. या पहिल्या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोहालीतील कामगिरी कशी राहिलीय, हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोहालीतील आकडेवारी ही फार चिंताजनक आहे. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियावर या मैदानात वनडे सामन्यात विजय मिळवणं अजून काही जमलेलं नाही. या मैदानात ऑस्ट्रेलियाच टीम इंडियावर वनडेत वरचढ राहिली आहे. ऑस्ट्रेलिया भारतात खेळतेय. मात्र आयपीएलमुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना इथल्या खेळपट्ट्यांबाबत बरीच माहिती आहे. कोणता बॉलर कशी बॉलिंग करतो, हे देखील ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना महितीये.
मोहालीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवणं टीम इंडियासाठी स्वप्नवत असं आहे. मात्र या सामन्यातून ऑस्ट्रेलिया विरुद्धचे आकडे सुधारण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे. टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 146 वनडे सामने खेळवणयात आले आहेत. या 146 पैकी 82 सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला उपट दिलीय. तर टीम इंडियाला फक्त 54 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तसेच भारतात दोन्ही संघ एकूण 67 वेळा भिडले आहेत. यामध्येही ऑस्ट्रेलियाच सरस आहे. ऑस्ट्रेलियाने या 67 पैकी 32 वनडे सामन्यात विजय मिळवलाय. तर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियावर 30 सामन्यात विजय मिळवता आलाय.
पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.
वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.