INDvsAUS | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियात 2 घातक खेळाडूंची एन्ट्री

| Updated on: Feb 03, 2023 | 11:46 PM

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा 9 फेब्रुवारीला नागपुरात खेळवण्यात येणार आहे.

INDvsAUS | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियात 2 घातक खेळाडूंची एन्ट्री
team india
Follow us on

नागपूर : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली मॅच गुरुवारी 9 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. या पहिल्या सामन्याचं आयोजन नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात करण्यात आलं आहे. या सीरिजसाठी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे. या दरम्यान बीसीसीआयने मोठी खेळी केली आहे. बीसीसीआयने 2 खेळाडूंचा टीममध्ये समावेश केला आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये टीमला एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोटात भीतीचं वातावरण आहे.

ऑस्ट्रेलिया टीम भारतात दाखल झाली आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा सामना दिल्ली, तिसरा धर्मशाळा आणि चौथा सामना अहमदाबाद येथे खेळवण्यात येईल. ऑस्ट्रेलिया टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र कांगारुंना भारतात 2004 पासून कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. या दरम्यान आता बीसीसीआयने 2 खेळाडूंना टीमसोबत जोडलंय.

या खेळाडूंची एन्ट्री

नागपूर टेस्टआधी बीसीसीआयने वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार या दोघांना नेट्समध्ये जोडलंय. आयपीएलमधील स्टार खेळाडू राहुल चाहर आणि साई किशोर या दोघांचा नेट्स बॉलर म्हणून आधीच जोडलंय. यासह चारही खेळाडू रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यासोबत ही चौकडी जोडली गेलीय.

हे सुद्धा वाचा

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.