
मुंबई : WTC च्या फायनल 2023 सामन्यामध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. या पराभवामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफीवर नाव करण्याचं स्वप्न भंगलं होतं. सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करूनही टीम इंडियाला यश आलं नाही. या पराभवानंतर भारतीय संघावर अनेक दिग्गज खेळाडूंनी टीका केली. या सामन्यामध्ये लहान चुका ज्या भारतीय संघासाठी खूप मोठ्या आणि त्याच पराभवाचा कारणही ठरल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने संघातील दोन खेळाडू आळशी असल्याचं म्हटलं आहे.
मोहम्मद कैफ याने संघातील ज्या दोन खेळाडूंना आळशी म्हणून संबोधलं आहे. ते खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून स्टार खेळाडू विराट कोहली आणि भारतीय संघाचा भरवशाचा फलंदाज म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा आहे. सामन्याच्या 72 व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑल राऊंडर अॅलेक्स कॅरीच्या बॅटची कट घेऊन चेंडू स्लिपमध्ये गेला. तिथे कोहली आणि पुजारा उभे होते मात्र दोघांच्या मधून चेंडू सीमारेषेपार गेला होता.
फिल्डिंगला करताना तुम्ही अशा संधी गमावू शकत नाही, अशा प्रकारे चेंडू दोघांच्यामधून जाणं म्हणजे आळशीपणाचं लक्षण आहे. फिल्डरला वाटतं की स्लिपमध्ये कॅच येणार नाही आणि आता काय डाव घोषित करतील. पण तुम्ही अशा संधी नाही सोडल्या पाहिजेत. शिन पॅडमुळे तुमचा वेग कमी होतो आणि तुम्हाला नीट वाकता येत नाही. या कॅचवेळी पुजारा स्लिपमध्ये शिन पॅड घालून क्षेत्ररक्षण करत असल्याचं कैफ म्हणाला.
दरम्यान, मोहम्मद कैफ याने यावेळी बोलतान ऑस्ट्रिलियन खेळाडूंच्या फिल्डिंगचं कौतुक केलं. पहिल्या डावात स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथने कोहलीचा घेतलेला झेल अफलातून होता. अशा मिळणाऱ्या अर्ध्या संधीचं सोनं कराव लागत असल्याचं म्हणत कैफने टीम इंडियावर फिल्डिंगवरून टीका केली.